आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

On Location: \'शोले\'च्या शूटिंगवेळी असा होता स्टार्सचा लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[धर्मेन्द्र आणि हेमा मालिनी यांचा फोटो क्लिक करताना अमिताभ बच्चन (वर), खाली अमजद खान, संजीव कुमार आणि रमेश सिप्पी (उजवीकडे), रमेश सिप्पी हेमा मालिनीसोबत (डावीकडे)]
मुंबईः 1975 मध्ये रिलीज झालेला आणि ब्लॉकबस्टर ठरलेला 'शोले' हा सिनेमा अलीकडेच पाकिस्तानात रिलीज करण्यात आला आहे. रमेश सिप्पी दिग्दर्शित हा सिनेमा अडीच वर्षांत तयार झाला होता. 15 ऑगस्ट 1975 रोजी सिनेमा थिएटरमध्ये झळकला.
बंगळूरुजवळील रामनगर येथे रामगडचा सेट उभा करण्यात आला होता. आज या भागाला रामगड या नावानेच ओळखले जाते. शूटिंगवेळचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, हेमामालिनी यांच्यासोबत अधिकाधिक रिटेक करण्याची संधी मिळावी यासाठी धर्मेंद्र स्पॉट बॉईंजना पैसे देऊन सीन खराब करायला सांगत होते.
याशिवाय सिनेमात एकमेकांचे कट्टर शत्रू म्हणून झळलेले गब्बर सिंह (अमजद खान) आणि ठाकूर बलदेव सिंह (संजीव कुमार) सेटवर घनिष्ठ मित्रांप्रमाणे एकत्र वेळ घालवत होते. शोलेच्या ऑन लोकेशन सेटवरील अशी अनेक छायाचित्रे आहेत, ज्यामध्ये कलाकारांमधील स्ट्राँग बाँडिंग बघायला मिळते.
Divyamarathi.com खास आपल्या वाचकांना 'शोले'च्या शूटिंगची खास छायाचित्रे घेऊन आले आहे. ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...