मुंबई- परवीन बाबीने या जगाचा निरोप घेऊन 11 वर्षे (20 जानेवारी 2005) उलटली आहेत. जेवढ्या स्टारडम आणि चर्चेत तिने यशाचा आलेख उंचावला तेवढ्याच अंधारात तिच्या आयुष्याचा शेवट झाला. परवीनच्या आयुष्यात तीन पुरुष आले, मात्र तिची आणि महेश भट यांची लव्हस्टोरी आजही सर्वांना आठवते. ही प्रेमकथा दुखद होती.
तीन वर्षे होते अफेअर...
परवीन
आपल्या करिअरमध्ये टॉप अभिनेत्रींमध्ये सामील होती. तेव्हा ती महेश भट्ट यांच्या नात्यात होती. 1977मध्ये दोघांचे प्रेम संबंध वाढले. त्यावेळी महेश भट्ट मात्र विवाहीत होते. तसेच, परवीनसुध्दा कबीर बेदीसोबतच्या ब्रेकअमधून बाहेर पडत होती. त्यांनी लिव्ह-इनमध्ये राहण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी परवीन 'अमर अकबर अँथनी' आणि 'काला पत्थर' सिनेमांची शुटिंग करत होती. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले होते, की त्यांच्यामध्ये केवळ प्रेमाला स्थान होते. दोघे जेव्हा एकत्र असायचे तेव्हा सर्व कामे आणि स्टारडम मागे पडत होते. परवीन महेश यांच्यावर जिवापाड प्रेम करत होती. परंतु या प्रेमाचा अंत खूप वाईट झाला.
या घटनेने हादरून गेले होते महेश...
महेश आणि परवीन यांच्या नात्याला 1979मध्ये दोन वर्षे उलटून गेली होती. त्या दिवशी महेश भट्ट यांना अचानक आपल्या आयुष्यातील एका मोठ्या सत्य घटनेचा सामना झाला. एक दिवशी जेव्हा महेश घरी परतले तेव्हा त्यांनी बघितले, की परवीन सिनेमातील एक कॉस्ट्युम परिधान करून घरातील एका कोप-यात हातात चाकू घेऊन बसलेली होती.
महेश यांना बघून ती म्हणाली, 'शांत बसा काहीच बोलू नका, खोलीमध्ये कुणीतरी आहे. तो मला मारण्याचा प्रयत्न करत आहे.' या विचित्र प्रसंगामुळे महेश यांना मोठा धक्काच बसला. त्यांनी परवीनचे हे रुप पूर्वी कधीच बघितले नव्हते. परंतु त्यानंतर परवीन नेहमीच अशी वागायला लागली होती. डॉक्टरांना दाखवल्यानंतर समजले, की तिला सिजोफ्रेनिया नावाचा मानसिक आजार आहे. परवीनच्या आजाराविषयी माहित होताच डॉक्टांनी सांगितले, की तिला लवकरात-लवकर ठिक करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक शॉक द्यावे लागतील. ज्या सिनेमा निर्मात्यांनी परवीनला साइन केले होते त्यांना आपले सिनेमे डबाबंद होण्याच्या मार्गावर दिसून येत होता. सर्वांना परवीन ठिक होण्याची मोठी प्रतिक्षा होती. त्यावेळी परवीनला इलेक्ट्रॉ़निक शॉक देण्यास महेश यांनी विरोध केला होता. तिचा माजी बॉयफ्रेंड कबीर बेदीनेसुध्दा त्यांची मदत केली आणि अमेरिकेच्या अनेक हॉस्पिटलमध्ये परवीनवर उपचार घेतले.
कबीर बेदी आणि डॅनीसोबत होते नाते...
बॉलिूवडमध्ये परवीन बाबीचे लिंकअप अभिनेता डॅनीसोबत जुळले. दोघे एकमेकांसाठी इतके क्रेजी होते, की 36 तासांत त्यांची जवळीक वाढली होती. मात्र जितक्या लवकर हे नाते जुळले तितक्याच लवकर संपुष्टातसुध्दा आले. डॅनीपासून वेगळी झाल्यानंतर परवीनच्या आयुष्यात कबीर बेदीची एंट्री झाली. कबीरचेसुध्दा त्याच्या पत्नीसोबत पटत नव्हते. कबीर आणि परवीन, दोघे बिनधास्त लाइफस्टाइलचे शौकीन होते. काही वर्षांच्या या अफेअरनंतर पुन्हा एकदा परवीनचे मन तुटले आणि ती एकांतात गेली. कबीरपासून विभक्त झाल्यानंतर महेश भट यांनी तिला आधार दिला होता.
परवीनच्या मृत्यूने खूप दुखी होते महेश...
2005मध्ये परवीन बॉबीचा रहस्यमय मृत्यूने पुन्हा एकदा महेश यांना मोठा धक्का दिला. कुटुंबातील कोणताही सदस्य तिचा मृतदेह घेण्यास आला नाही तेव्हा महेश यांनी स्वत: तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार असल्याचे सांगितले होते.
त्यांच्या सांगण्यानुसार, ते अजूनही परवीनवर प्रेम करत होते. तिच्यासाठी काहीतरी करण्याची त्यांनी इच्छा होती. महेश यांच्या मते, 'अर्थ' आणि 'वो लम्हे' हे दोन्ही सिनेमे परवीनचे आभार व्यक्त करण्याचे एक माध्यम होते.
वयात असताना केले नाही लग्न...
तीनवेळा प्रेमात पडूनसुध्दा परवीन अविवाहितच राहिली. तिला नाव, प्रसिध्द, पैसे, स्टारडम सर्वकाही मिळाले. मात्र आयुष्यभर साथ देईल असा जोडीदार मिळालाच नाही. हिंदी सिनेसृष्टीत अनेक अभिनेत्री आहेत, ज्या प्रेमात तर पडल्या मात्र त्यांचे कधीच लग्न होऊ शकले नाही आणि त्या आविवाहितच राहिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बॉलिवूडच्या अशाच काही अभिनेत्रींविषयी...