आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : ओसाड पडलेल्या या घरात जन्मले होते किशोर कुमार, येथेच झाले होते अंत्यसंस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा : दिवंगत गायक-अभिनेते किशोर कुमार आज आपल्यात असते तर त्यांनी वयाची ८७ वर्षे पूर्ण केली असती. ४ ऑगस्ट १९२९ रोजी खंडवा (मध्य प्रदेश) येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे बालपण येथेच त्यांच्या वडिलोपार्जित घरात गेले होते. इतकेच नाही तर त्यांच्यावर अंत्यसंस्कारसुद्धा याच ठिकाणी करण्यात आले होते.
१०० वर्षे जुने आहे त्यांचे वडिलोपार्जित घर..
किशोर कुमार यांचे वडिलोपार्जित घर अर्थातच गांगुली निवास शंभर वर्षे जुने आहे. त्यांचे वडील कुंजीलाल गांगुली यांनी हे घर बनवले होते. हे घर शहरातील बांबे बाजार या मुख्य व्यावसायिक क्षेत्रात आहे. घराच्या आजुबाजुच्या परिसरात ११ दुकाने आहेत. हे घर ७६०० चौरस. फुटात पसरले आहे.

वर्षातून दोनदा खंडवास्थित घरी यायचे किशोर कुमार...
किशोर कुमार इंडस्ट्रीतील आपल्या काही मित्रांसमवेत वर्षातून दोनदा खंडवा येथे यायचे. मुंबई सोडून त्यांनी खंडवात स्थायिक होण्याची तयारीदेखील केली होती. मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. मृत्युपत्रातील त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार, त्यांचे पार्थिव या घरी आणण्यात आले होते. आता मात्र हे घर ओसाड पडले आहे.

मुले म्हणाली, बाबाचे घर बघून मनाला समाधान मिळतं...
किशोर कुमार यांचा धाकटा मुलगा सुमित गांगुली दोन वर्षांपूर्वी ऑगस्ट महिन्यात आपल्या या वडिलोपार्जित घरात आले होते. येथे ते तासभर थांबले आणि घराचे छत, मोडित आलेले साहित्य निरखून पाहू लागले. घरातून बाहेर पडल्यानंतर ते म्हणाले, "या घरात मी पहिल्यांदा आलो. येथे येऊन बाबा (किशोर कुमार) यांच्या आठवणी ताज्या झाल्या."

सुमीत हे किशोर कुमार आणि त्यांची चौथी पत्नी लीना चंदावरकर यांचा मुलगा आहे. बालपणी ते किशोर कुमार यांच्यासोबत खंडव्यात आले होते. मात्र त्यावेळी ते केवळ दोन अडीच वर्षांचे असतील. सुमीत म्हणाले होते, "ही माझ्या वडिलांची आठवण आहे. या घराशी त्यांच्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना डोळे पाणावतात. मी घरात काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आज बाबांचे घर बघून मनाला समाधान मिळाले."

घर आणि दुकानाची किंमत १२ कोटींच्या घरात...
२६ ऑगस्ट २०१४ रोजी किशोर कुमार यांचा मुलगा सुमित आणि अनुप कुमार यांचा मुलगा अर्जुन खंडव्यातील बांबे बाजार स्थित आपल्या घरी आले होते. दोघांनीही लीगल अॅडवाइजर आणि प्रॉपर्टी ब्रोकरसोबत घराची पाहणी केली होती. कुमार भावांनी प्रॉपर्टी ब्रोकरसह विक्रीसंबंधी एक तास चर्चा केली होती. किशोर कुमार यांचे हे वडिलोपार्जित घर आता अनूप कुमार यांचा मुलगा अर्जुन कुमारच्या नावावर आहे. ७६०० चौरस. फुटात पसरलेल्या या घराची आणि दुकानाची किंमत जवळपास (सरकारी दरानुसार) बारा कोटी रुपये ठरवण्यात आली आहे. याचा बाजार भाव 15 ते 16 कोटींच्या घरात आहे. कुमार भावंडं खंडवामध्ये पोहोचल्यानंतर घराची विक्री सहा कोटींमध्ये झाल्याची अफवा पसरली होती. किशोर कुमार यांच्या चाहत्यांची इच्छा आहे, की या घरात त्यांचे स्मारक बनवले जावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा किशोर कुमार यांच्या वडिलोपार्जित घराची काही निवडक छायाचित्रे...

नोट : या पॅकेजधील काही छायाचित्रे probollywood.comहून साभार घेण्यात आली आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...