आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Total Recall: मुंबईत इंदिरा गांधींना मिळाला नव्हता हॉल, तेव्हा बॉलिवूडने केली होती त्यांना मदत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः आणीबाणीनंतर निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इंदिरा गांधी यांना मुंबईत (तेव्हा बम्बई) पत्रकार परिषदेसाठी कुठलेही हॉटेल जागा देण्यास तयार नव्हते. तेव्हा सुनील दत्त आणि राज कपूर त्यांच्या मदतीसाठी पुढे आले होते. 19 नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची 100 वी जयंती आहे. यानिमित्ताने dainikbhaskar.com ने प्रसिद्ध चित्रपट समीक्षक जयप्रकाश चौकसेंसोबत बातचित केली असता, त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या. चौकसे यांनी सांगितल्याप्रमाणे, वरील फोटो त्याकाळात सहारा हॉटेलच्या लॉनमध्ये क्लिक झालेला होता. राज बब्बर यांनी पोस्ट केला फोटो...

गेल्यावर्षी काँग्रेस नेता राज बब्बर यांनी इंदिरा गांधी आणि फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गजांचा एक फोटो त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला होता. तेव्हा हा फोटो बराच व्हायरल झाला होता. मात्र हा फोटो कधी आणि कुठे क्लिक झाला होता, याविषयीची माहिती समोर आली नव्हती. चौकसे यांनी हा फोटो कधी आणि कुठचा आहे, याविषयीची माहिती दिली. चौकसे यांनी सांगितल्याप्रमाणे इंदिरा गांधी नसत्या तर रिचर्ड एटेनबरो यांचा सिनेमा ‘गांधी’ कधी बनू शकला नसता.
चौकसे सांगतात, आणीबाणीनंतर जेव्हा इंदिरा गांधी निवडणुक हरल्या होता. त्यानंतर 1977 मध्ये त्यांचे मुंबईत येण्याचे निश्चित झाले होते. येथे त्यांना एक पत्रकार परिषद घ्यायची होती. मात्र कुठेही त्यांना जागा मिळत नव्हती. तेव्हा त्यांनी सुनील दत्त यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यास सांगितले. सुनील दत्त इंदिरा यांच्या जवळचे होते. त्यांनी दिलेल्या तिकिटावरच ते निवडणुक लढले होते. सुनील दत्त यांनी राजकपूर आणि दिलीप कुमार यांच्याशी चर्चा केली, "हे जे सरकार (मोरारजी देसाई सरकार) आले आहे, यामध्ये इंदिरा गांधी यांना प्रेस कॉन्फरन्साठी मुंबईत कुठेही हॉल उपलब्ध होत नाहीये. प्रत्येक जण बुकिंगचा बहाणा पुढे करत आहेत, काय करु? तेव्हा राज कपूर म्हणाले, काळजी करु नका, एअरपोर्टसमोर जे सहारा हॉटेल आहे, मी तिथे माझ्या नावाने बुकिंग करुन देतो, तेथेच प्रेस कान्फरन्स होईल." अशाप्रकारे या सहारा हॉटेलमध्ये इंदिरा गांधीनी पत्रकार परिषद घेतली होती.

चौकसे सांगतात, हा त्याकाळातीलच फोटो आहे. सहारा हॉटेलच्या लॉनमध्ये फिल्म इंडस्ट्रीतील सर्व दिग्गज एकत्र आले होते. हा क्षण त्यावेळी कॅमे-यात कैद झाला होता.

पुढे वाचा - इंदिरा गांधींसाठी दिलीप कुमार यांनी ठेवली होती पार्टी, धावत-धावत पोहोचले होते राज कपूर

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...