Home »Flashback» Puneet Issar Life After Coolie Film

या अभिनेत्यामुळे अमिताभ पोहोचले होते मृत्यूच्या दाढेत, लोक करु लागले होते तिरस्कार

दिव्य मरा्ठी वेब टीम | Aug 02, 2017, 16:00 PM IST

2 ऑगस्ट 1982 ही तारीख बॉलिवूडच्या इतिहासात अतिशय महत्त्वाची आहे. याच दिवशी अमिताभ बच्चन मृत्यूच्या दाढेतून परत आले होते. आम्ही सांगतोय, 1982 मधील त्या घटनेविषयी, ज्यामध्ये अमिताभ बच्चन मृत्यूच्या दारात गेले होते. 26 जुलै 1982 रोजी बिग बी मनमोहन देसाई यांच्या 'कुली' सिनेमाचे बंगळुरुमध्ये शूटिंग करत होते. बंगळुरु यूनिव्हर्सिटीमध्ये बिग बी आणि पुनीत इस्सर यांना सिनेमासाठी एक महत्वाचा सीन शूट करायचा होता. यादरम्यान अमिताभ यांना पुनीतचा एक बुक्का इतक्या जोरात लागला, की त्यांच्या आतड्यांमध्ये रक्तस्त्राव सुरु झाला होता.
2 ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले होते. बिग बी पुन्हा सिनेसृष्टीत परतले आणि त्यांनी 'कुली'चे शूटिंग पूर्ण केले. हा सिनेमा खूप गाजला होता. पण या घटनेनंतर पुनीत इस्सर ज्यांच्यामुळे बिग बी गंभीर जखमी झाले होते, ते मात्र लोकांच्या नजरेत खलनायक ठरले. पुनीत इस्सर यांचा लोक तिरस्कार करु लागले होते. तीन ते चार वर्षे ते बेरोजगार झाले होते.

जाणून घेऊयात, अमिताभ बच्चन यांच्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर पुनीत इस्सर यांचे आयुष्य कसे बदलले होते....

Next Article

Recommended