आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raj Singh Dungarpur And Lata Mangeshkar Relation

लतादीदी आणि या महाराजांचे नाते होते खूप खास, एका वचनामुळे झाले नाही मिलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लता मंगेशकर आणि राजसिंह डुंगरपुर - Divya Marathi
लता मंगेशकर आणि राजसिंह डुंगरपुर

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला राजस्थानच्या डुंगरपूर राजघराण्याचे महाराजा राहिलेले राजसिंह डंगुरपूर आणि लता मंगेशकर यांच्या नात्याविषयी सांगत आहे...
उदयपूरः डुंगरपूर राजघराण्याचे राजसिंह आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांच्या आणि लता मंगेशकर यांच्या नात्याविषयी बरेच दिवस अनेक चर्चा रंगत होत्या. लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि राज सिंह खूप चांगले मित्र होते. हे दोघे एकत्र क्रिकेट खेळायचे. राजसिंह मुंबईत लॉचे शिक्षण घेत असताना त्यांची भेट हृदयनाथ यांच्यासोबत झाली होती. राजसिंह यांचे लतादीदींच्या घरी येणे-जाणे सुरु झाले होते. बघताबघता राजसिंह यांची लता यांच्यासोबत खूप चांगली मैत्री झाली. असे म्हटले जाते, की राजसिंह यांनी आपल्या वडिलांना दिलेल्या एका वचनामुळे त्यांचे लतादीदींसोबत लग्न होऊ शकले नव्हते. मात्र त्यांची आणि
लतादीदींची मैत्री नेहमीच चर्चेत राहिली.
राजसिंह यांना होती क्रिकेटची विशेष आवड, बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषवले
डुंगरपूर राजघराण्यातील महाराजा राजसिंह यांनी केवळ राजकारणातच नव्हे तर क्रिकेट विश्वातही नाव कमावले. राजसिंह 16 वर्षे राजस्थानच्या रणजी टीमचे सदस्य होते. अनेक वर्षे त्यांनी बीसीसीआयसोबतही काम केले. त्यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपदही भूषवले. भारतीय टीमच्या अनेक दौ-यांमध्ये त्यांनी मॅनेजरची भूमिका निभावली.
कोण होते महाराज राजसिंह...
महाराज राजसिंह यांचा जन्म 19 डिसेंबर 1935 रोडी डुंगरपूर या राजपुत राजघराण्यात झाला होता. ते डुंगरपूरचे महाराजा लक्ष्मण सिंह यांच्या तीन मुलांमध्ये सर्वात लहान होते. त्यांच्या तीन बहिणींपैकी एक बीकानेरच्या महाराणी होत्या. राजसिंह यांनी आपले शिक्षण इंदोर येथील डेली कॉलेजमधून केले होते. 12 सप्टेंबर 2009 रोजी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
पुढे वाचा, राजसिंह आणि लता यांच्या नात्याविषयी, सोबतच जाणून घ्या, कोणत्या वचनामुळे त्यांचे लतादीदींसोबत लग्न होऊ शकले नव्हते...