Home »Flashback» Rajesh Khanna Jealous ON Amitabh Bachchan Here Is The Reason

राजेश खन्ना यांना वाटायचा अमिताभ यांचा हेवा, 'बावर्ची'च्या सेटवर सर्वांसमोर म्हणाले होते 'मनहूस'

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 16:36 PM IST

मुंबईः अमिताभ बच्चन यांचे इंडस्ट्रीत तसे पाहता सगळ्यांशीच मैत्रीचे संबंध आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यातील वादाच्या बातम्या मीडियामध्ये येत होत्या. 70 च्या दशकातील ही बाब आहे. त्यावेळी राजेश खन्ना अनेकदा अमिताभ यांचा अपमान करायचे. फिल्म जर्नालिस्ट अली पीटर जॉन यांच्या मते त्यांनी या दोघांची दुश्मनी स्वतः पाहिली होती. 2014 मध्ये एका रिपोर्टमध्ये अली यांनी राजेश खन्ना यांच्याबाबत असाच एक खुलासा केला होता.

अमिताभला राजेश खन्ना म्हणाले होते 'मनहूस'
- अली यांच्या मते 'बावर्ची' (1972) च्या सेटवर अमिताभ बच्चन नेहमी त्यांची जया बच्चन आणि असराणीसह इतर मित्रांना भेटायला जात होते. त्यावेळी राजेश खन्ना नेहमी त्यांचा अपमान करायचे.
- अली यांच्या मते एकदा अमिताभ जेव्हा सेटवर पोहोचले तेव्हा राजेश खन्ना यांनी त्यांना 'मनहूस' म्हटल्याचे त्यांनी स्पष्टपणे ऐकले होते.
- जया भादुरी (आता बच्चन) यांनीही ते ऐकले आणि त्या चांगल्याच चिडल्या होत्या. जयाने राजेश खन्नाच्या जवळून जाताना टोमणा मारत, एक दिवस हा व्यक्ती (अमिताभ) कुठे असेल आणि तू कुठे असशील हे जग बघेल असे म्हटले होते.
- नंतर जया यांनी म्हटलेले खरे ठरले. पुढे अमिताभ बच्चन कसे सुपरस्टार बनत गेले आणि राजेश खन्ना यांचे करिअर कसे उतरणीला लागले हे सर्वांनीच पाहिले.

पुढील स्लाइड्सवर वाचा अमिताभ यांच्यावर का जळायचे राजेश खन्ना...
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended