आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा राजेश खन्ना बिग बींना म्हणाले होते मनहूस, अशी होती जयाची रिअॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजेश खन्ना आपल्यातून जावून 5 वर्षे लोटली आहेत. 18 जुलै 2012 रोजी मुंबईतील आशिर्वाद बंगल्यात कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले होते. एक काळ होता, जेव्हा अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांच्यातील वादाच्या बातम्या मीडियामध्ये येत होत्या. 70 च्या दशकातील ही बाब आहे. त्यावेळी राजेश खन्ना अनेकदा अमिताभ यांचा अपमान करायचे. फिल्म जर्नालिस्ट अली पीटर जॉन यांच्या मते त्यांनी या दोघांची दुश्मनी स्वतः पाहिली होती. 2014 मध्ये एका रिपोर्टमध्ये अली यांनी राजेश खन्ना यांच्याबाबत असाच एक खुलासा केला होता. 

अमिताभला राजेश खन्ना म्हणाले 'मनहूस' 
- अली यांच्या मते 'बावर्ची' (1972) च्या सेटवर अमिताभ बच्चन नेहमी त्यांची जया बच्चन आणि असराणीसह इतर मित्रांना भेटायला जात होते. त्यावेळी राजेश खन्ना नेहमी त्यांचा अपमान करायचे. 
- अली यांच्या मते एकदा अमिताभ जेव्हा सेटवर पोहोचले तेव्हा राजेश खन्ना यांनी त्यांना 'मनहूस' म्हटल्याचे त्यांनी स्पष्टपणे ऐकले होते. 
- जया भादुरी (आता बच्चन) यांनीही ते ऐकले आणि त्या चांगल्याच चिडल्या होत्या. जयाने राजेश खन्नाच्या जवळून जाताना टोमणा मारत, एक दिवस हा व्यक्ती (अमिताभ) कुठे असेल आणि तू कुठे असशील हे जग बघेल असे म्हटले होते. 
- नंतर जया यांनी म्हटलेले खरे ठरले. पुढे अमिताभ बच्चन कसे सुपरस्टार बनत गेले आणि राजेश खन्ना यांचे करिअर कसे उतरणीला लागले हे सर्वांनीच पाहिले. 

पुढील स्लाइड्सवर वाचा अमिताभ यांच्यावर का जळायचे राजेश खन्ना...
 
बातम्या आणखी आहेत...