Home »Flashback» Rajinikanth Was Being Spat On His Face By Sridevi In Reality

चक्क रजनीकांतवर थुंकली होती श्रीदेवी, हे होते त्यामागचे कारण

दिव्य मराठी वेब टीम | Aug 09, 2017, 00:09 AM IST

अभिनेत्री श्रीदेवीचा येत्या 13 ऑगस्ट रोजी वाढदिवस असून ती वयाची 54 वर्षे पूर्ण करणार आहे. हिंदी सिनेसृष्टीच्या या सुपरस्टारने तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासून सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या श्रीदेवीने तिच्या करिअरमध्ये 300 सिनेमे केले आहेत. तिचा 'मॉम' हा चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. 'मॉम' हा तिच्या करिअरमधील 300 वा चित्रपट आहे.
एका सीनमध्ये चक्क रजनीकांतवर थुंकली होती श्रीदेवी...
- श्रीदेवीने आतापर्यंत हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ‘16वायाथिनाले’ हा सिनेमा तिच्या नेहमीच लक्षात राहिल असा आहे. या चित्रपटाच्या एका दृश्यात श्रीदेवीला सुपरस्टार रजनिकांत यांच्यावर चक्क थुंकायचे होते.
- अनेक रिटेकनंतरही तिला ते दृश्य चित्रीत करायला जमत नव्हते. शेवटी यावर उपाय म्हणून चक्क रजनी यांनीच श्रीदेवीला थोडं पुढे येऊन त्यांच्यावर खरंखुरं थुंकायला सांगितलं. परफेक्शनसाठी त्यांनी श्रीदेवीला त्यांच्यावर थुंकायला सांगितले होते.
- रजनीकांत यांच्या सांगण्यावरुन श्रीदेवी खरोखरंच त्यांच्यावर थुंकली आणि दिग्दर्शकाने त्या सीनला ओकेही दिलं.
रजनीकांत यांच्याशी कुणीही बोलायचे नाही...
- रजनीकांत यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमधले काही किस्से एका मुलाखतीत सांगितले होते.
- करिअरच्या सुरुवातीच्या काळातील एक किस्सा सांगताना ते म्हणाले होते, ‘दाक्षिणात्य सिनेमांमध्ये जेव्हा काम करायला सुरूवात केली तेव्हा मी एक होतकरु कलाकार आहे असेच पाहिले जायचे. माझ्याशी कोणी बोलायचेही नाही. एवढंच काय तर माझ्या सिनेमाचे निर्माते एसए राजकन्नू यांच्याशी माझी पहिली भेट सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच झाली होती.’

चित्रपट फ्लॉप होण्याची झाली होती चर्चा...
- ‘16 वायाथिनाले’ या सिनेमात रजनीकांत आणि श्रीदेवीसोबत कमल हसन यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.
- या सिनेमाचा एक किस्सा सांगताना कमल म्हणाले होते, ‘सुरुवातीला हा सिनेमा अजिबात चालणार नाही असेच प्रत्येकजण बोलत होते. एकदा तर स्टुडिओमधून घरी जात होतो, तेव्हा बाइकवरून एक व्यक्ती आला आणि मला म्हणाला की हा सिनेमा अजिबातच चालणार नाही. पण प्रदर्शनानंतर हा सिनेमा सुपरहिट ठरला.’

पुढे वाचा, स्वतःपेक्षा 13 वर्षांनी मोठ्या रजनीकांतची आई झाली होती श्रीदेवी..

Next Article

Recommended