Home »Flashback» Rare Photos: Amitabh Bachchan And Jaya Bhaduri Reception At Hotel Imperial Sabre, Bhopal

लग्नानंतर सासरी झाले होते अमिताभ-जया यांचे वेडिंग रिसेप्शन, पहिल्यांदाच बघा Rare Photos

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 12:44 PM IST

  • भोपाळ येथे आयोजित अमिताभ-जया यांच्या रिसेप्शनला तत्कालीन राज्यपाल सत्यनारायण सिन्हा यांनी उपस्थिती लावली होती. फोटोत त्यांच्यामागे अर्जुन सिंह आणि समोर तरुण भादुरी (जया बच्चन यांचे वडील)
भोपाळ हे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे सासर आहे. अमिताभ आणि जया यांच्या लग्नानंतर भोपाळ येथे वेडिंग रिसेप्शन ठेवण्यात आले होते. 1974 साली भोपाळच्या मोठ्या तलावाच्या किना-यावर असलेल्या इंपिरियल सॅबर नावाच्या एका हॉटेलमध्ये ही पार्टी ठेवण्यात आली होती. पूर्वी हे हॉटेल हे महाल होते, नंतर त्याचे रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्यात आले होते. अमिताभ आणि जया यांचे लग्न 3 जून 1973 रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर एक रिसेप्शन जया बच्चन यांच्या माहेरच्या मंडळींनी आयोजित केले होते. एमपीचे तत्कालीन राज्यपाल सत्यनारायण सिन्हा आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अर्जुन सिंह यांच्यापासून अनेक मोठी मंडळी या रिसेप्शनला पोहोचली होती.

भोपाळ येथे झाले जया यांचे शालेय शिक्षण...
जया भादुरीचा जन्म जबलपूर येथे झाला. पण त्यांचे बालपण भोपाळमध्ये गेले. येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. जया यांचे वडील तरुण भादुरी भोपाळचे प्रसिद्ध पत्रकार होते. जया यांच्या मातोश्री इंदिरा भादुरी आजही भोपाळमध्ये वास्तव्याला आहेत.

नवाबांचे गेस्ट हाउस
भोपाळच्या इंपीरियल सॅबरची निर्मिती इंग्रज पाहुण्यांसाठी गेस्ट हाउसच्या रुपात करण्यात आली होती. 1960 रोजी याचे हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले. अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या लग्नाचे रिसेप्शन याच हॉटेलमध्ये झाले होते. नवाब काळात या हॉटेलचा वापर गेस्ट हाऊस म्हणून व्हायचा.
पुढील स्लाईड्सवर, पहिल्यांदाच बघा, भोपाळ येथे झालेल्या अमिताभ-जया यांच्या वेडिंग रिसेप्शनचे खास फोटोज...
BIG B @ 75 Special

Next Article

Recommended