आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RARE PHOTOS: स्क्रिन टेस्टमध्ये फेल झाल्यानंतर इन्शोरन्स कंपनीत कामाला होते अमरीश पुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. 'मि. इंडिया' या सिनेमात अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्रभूमिका साकारणारे अमरिश पुरी यांचा आज स्मृतीदिन आहे. 22 जून रोजी 1932 रोजी लाहोर, पंजाब (आता पाकिस्तान) येथे जन्मलेल्या अमरिश यांचे 12 जानेवारी 2005 रोजी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले होते. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर 'मोगॅम्बो खामोश हुआ' असे वृत्तपत्रांचे मथळे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली. 

स्क्रिनटेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतर इन्शुरन्स कंपनीत सुरु केले होते काम...
अमरिश पुरी यांचे दोन्ही मोठे भाऊ म्हणजेच मदन आणि चमन पुरी हे अमरीश पुरी यांच्या आधीपासूनच अभिनय क्षेत्रात होते. मात्र, अमरिश पुरी पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये अपयशी झाले होते. त्यानंतर त्यांनी एम्प्लॉईज स्टेट इन्शोरन्स कॉर्पोरेशनमध्ये काम केले.

पुढील स्लाईड्सवर वाचा, अमरिश पुरी यांच्या आयुष्यातील अशाच काही खास गोष्टी...