आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बी टाऊन स्टार्स 70च्या दशकात असे करायचे सिनेमाचे शूटिंग, तुम्ही पाहिलेत का हे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका सिनेमातील इंटीमेट सीनचे शूटिंग करताना सिमी ग्रेवाल. - Divya Marathi
एका सिनेमातील इंटीमेट सीनचे शूटिंग करताना सिमी ग्रेवाल.
मुंबईः दिग्दर्शक सत्यजीत रे यांचे फोटोग्राफर म्हणून प्रसिद्ध असलेले नेमई घोष यांनी तीन दशकांच्या आपल्या दीर्घ करिअरमध्ये पडद्याच्या मागील अनेक क्षण कॅमे-यात बंदिस्त केले आहेत. या फोटोजमध्ये नेमई यांनी बॉलिवूड स्टार्सचा नॅचरल अंदाज दाखवला आहे. Cinemadrome या फेसबुक पेजवर नेमई यांनी 70च्या दशकात क्लिक केलेले अनेक ग्लॅमरस फोटोज बघायला मिळतात. 
 
आजवर पडद्यामागाचे होते हे कलेक्शन...   
नेमई  यांचा जन्म 1934 साली झाला होता. सत्यजीत रे आणि नेमई यांनी सुमारे 25 वर्षे सोबत काम केले. 1991 साली रिलीज झालेला 'आगंतुक' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. आपल्या 35 वर्षांच्या करिअरमध्ये नेमई यांनी स्वतंत्रपणेही काम केले होते. एवढ्या वर्षांत त्यांचे हे कलेक्शन पडद्यामागेच राहिले होते.  मात्र काही वर्षांपूर्वी नेमई घोष यांच्या छायाचित्रांचे दिल्लीतील एका आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवण्यात आले होते.  त्यांनी 1,20,000 हून अधिक फोटोज आपल्या कॅमे-यात टिपले आहेत. या फोटोजमध्ये सिनेमा स्टार्स आणि शूटिंग सेटवरील अनेक फोटोजचा समावेश आहे. 

नेमई घोष यांनी क्लिक केलेले निवडक फोटोज बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
बातम्या आणखी आहेत...