आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare Pics: आता उरल्या फक्त आठवणी... बघा कुटुंबीय-मित्रांसोबतचे शशी कपूर यांचे खास क्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे आज (4 डिसेंबर) दीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बालकलाकाराच्या रुपात अभिनय करिअरला सुरुवात करणा-या शशी कपूर यांच्या हस्यात इतकी जादू होती, की प्रेक्षक आपोआप त्यांच्या सिनेमांकडे आकर्षित होत असे. 

आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 160 हून अधिक चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या.  ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने निधन, वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

1948 मधील ‘आग’ आणि 1951 मध्ये आलेल्या ‘आवारा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी राजकपूरच्या बालपणाच्या भूमिका केल्या. 1961 साली आलेल्या ‘धर्मपुत्र’ या चित्रपटात शशीकपूर पहिल्यांदा नायक म्हणून चमकले. त्यानंतर त्यांनी  जब जब फुल खिले, शर्मिली,कभी कभी, बसेरा, पिघलता आसमान, रोटी कपडा और मकान अशा एकाहून एक विलक्षण चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांचा ‘दिवार’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड ठरला. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या जोडीने बॉक्सऑफिसवर एकच धमाल उडवून दिली. 


शशी कपूर यांना 2011 मध्ये ‘पद्मभूषण’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. सिनेक्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी शशी कपूर यांना 2014साठी दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.


पाहुयात, शशी कपूर यांची आठवणीतील निवडक छायाचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...