आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Recall: Bollywood Celebs At Shammi Kapoor Funeral

बिग बी, प्रियांकासह अनेक कलाकारांनी साश्रुनयनांनी दिला होता शम्मी कपूर यांना अखेरचा निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शम्मी कपूर यांच्या अंत्यसंस्कार पोहोचलेले बिग बी, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा - Divya Marathi
शम्मी कपूर यांच्या अंत्यसंस्कार पोहोचलेले बिग बी, रणबीर कपूर, प्रियांका चोप्रा

मुंबई - जेव्हा कुठे ''याहू.. चाहे कोई मुझे जंगली कहे..'' हे गाणे ऐकू येते, तेव्हा बर्फावरुन घसरत येणारे नायक शम्मी कपूर यांची आठवण आवर्जुन होते. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांना या जगाचा निरोप घेऊन चार वर्षे झाली आहेत. 14 ऑगस्ट 2011 रोजी शम्मी साहेबांनी अखेरचा श्वास घेतला होता.
घरातूनच मिळाला होता अभिनयाचा वारसा..
हिंदी सिनेजगतातील शम्मी कपूर असे अभिनेते होते, जे उत्साह मोठ्या पडद्यावर रोमँटिक अंदाजात सादर करत होते. शम्मी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये मोठे बदल घडवून आणले. त्यांनी नेहमी एकाच धाटणीच्या भूमिका वठवण्यापेक्षा नवनवीन प्रयोग करण्याला पसंती दिली. 21 ऑक्टोबर 1931 रोजी मुंबईत जन्मलेले शम्मी कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर फिल्म इंडस्ट्रीतील महान कलाकार होते. घरातच चित्रपटांची पार्श्वभूमी असल्यामुळे बालपणापासूनच शम्मी कपूर यांनाही अभिनयाची गोडी लागली. 1953 मध्ये 'जीवन ज्योती' या सिनेमाद्वारे शम्मी कपूर यांनी मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतली. रंजक गोष्ट म्हणजे शम्मी कपूर यांना रिबेल स्टार (विद्रोही कलाकार) ही उपाधी देण्यात आली होती. कारण त्यांनी उदासीनता असलेल्या भूमिकांना नाकारुन अभिनयाची नवी शैली विकासित केली होती.
मुमताजसह लग्न करण्याची होती शम्मी कपूर यांची इच्छा...
मुमताज 18 वर्षांच्या असताना शम्मी कपूर यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. मुमताज यांचेही शम्मी कपूर यांच्यावर प्रेम होते. शम्मी कपूर यांची इच्छा होती, की मुमताज यांनी आपले फिल्मी करिअर सोडून त्यांच्यासह लग्न करावे. मात्र मुमताज यांनी त्यासाठी त्यांना नकार दिला. एका मुलाखतीत मुमताज यांनी सांगितले होते, की तेव्हा मी 18 वर्षांची होती. 'ब्रम्हचारी' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान माझा त्यांच्यावर जीव जडला होता. मात्र मी माझे करिअर सोडावे, अशी त्यांची इच्छा होती. माझ्यावर माझ्या कुटुंबाची जबाबदारी होती. 'बूंद जो बन गई मोती' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी माझ्या आईला गमावले होते. मुमताज यांनी नकार दिल्यानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले.
गीता बालींची केली जोडीदाराच्या रुपात निवड...
शम्मी कपूर यांनी आपल्या आयुष्याच दोनदा लग्न केले. गीता बाली आणि नीला देवी ही त्यांच्या पत्नींची नावे आहेत. 'रंगीला रतन' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान शम्मी कपूर यांचे गीता बाली यांच्यासह सूत जुळले. मात्र त्यावेळीअभिनेत्रींसह त्यांच्या घरातील मुले लग्न करणार नाहीत, असा कपूर घराण्याचा एक अघोषित नियम होता. त्यामुळे शम्मी आणि गीता बाली थोडे धास्तावलेले होते. पहिल्या भेटीनंतर जवळजवळ चार महिन्यांनी शम्मी कपूर आणि गीता बाली यांनी मुंबईतील एका मंदिरात लग्न केले आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाला सांगितले. 1965 मध्ये कांजिण्यामुळे गीता बाली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनामुळे शम्मी कपूर यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी स्वतःकडे लक्ष देणे सोडून दिले. त्यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढत गेले. 1969 मध्ये त्यांचे नीला देवी यांच्यासोबत लग्न झाले.
नवोदित अभिनेत्रींना द्यायचे सिनेमात संधी...
60च्या दशकात शम्मी कपूर यशोशिखरावर होते. जेव्हा एखाद्या निर्मात्याला नवोदित अभिनेत्रीला आपल्या सिनेमात कास्ट करायचे असायचे, तेव्हा ते शम्मी कपूर यांच्या नायिकेच्या रुपात तिला सिनेमात घ्यायचे. यामध्ये सायरा बानो (जंगली, 1961) आशा पारिख (दिल देके देखो, 1963) साधना (राजकुमार, 1964) आणि शर्मिला टागोर (कश्मीर की कली) या अभिनेत्रींच्या नावाचा समावेश आहे.
इंटरनेटचे दिवाने होते 'याहू बॉय'...
शम्मी कपूर इंटरनेटचा उपयोग करणारे केवळ फिल्म इंडस्ट्रीतीलच नव्हे तर देशातील प्रारंभिक लोकांपैकी एक आहेत. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणा-या शम्मी कपूर यांनी 14 ऑगस्ट 2011 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
अंत्ययात्रेत पोहोचले होते अनेक कलाकार...
शम्मी कपूर यांना अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, आमिर खान, फरदीन खान. माधुरी दीक्षितसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी अखेरचा निरोप दिला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शम्मी कपूर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कोणकोण पोहोचले होते...