मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांना या जगाचा कायमचा निरोप घेऊन तीन वर्षे झाली आहे. 21 ऑक्टोबर 2012 रोजी डेंग्यूमुळे यश चोप्रा यांचे मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले होते. 'किंग ऑफ रोमान्स' नावाने प्रसिद्ध यश चोप्रा यांना अखेरचा निरोप द्यायला शाहरुख खान, सलमान खानसह बॉलिवूडचे अनेक कलाकार आले होते.
कतरिना कैफ, दीपिका पदुकोण, रेखा, काजोल, रानी मुखर्जी, रेखा, तनुजा, विद्या बालन, प्रीती झिंटा, डायरेक्टर रोहित शेट्टी, शाहिद कपूर, वरुण धवन, गौरी खान, दिवंगत संगीतकार आदेश श्रीवास्तव, भाग्यश्री, सिंगर अनु मलिक, पंकज कपूर, अनिल कपूर सह अनेक बॉलिवूड कलाकार त्यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी यशराज स्टुडिओत पोहोचले होते.
यश चोप्रा यांनी यशराज फिल्म्सचा पाया रोवला. त्यांच्या होम प्रॉडक्शनमध्ये 'दाग', 'कभी-कभी', 'सिलसिला', 'चांदनी', 'लम्हे', 'दीवार' आणि 'त्रिशूल'सह अनेक अविस्मरणीय सिनेमे तयार झाले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा सिनेमा 'जब तक है जान' हा होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, यश चोप्रा यांच्या अंत्य यात्रेत सहभागी झालेल्या कलाकारांची छायाचित्रे...