(फाइल फोटो- नफिसा जोसेफ)
अल्पावधीतच प्रसिद्धी प्राप्त करणा-या सेलिब्रिटींमध्ये दिवंगत मॉडेल नफिसा जोसेफ हिच्या नावाचा समावेश आहे. मात्र प्रेमात विश्वासघात झाल्यामुळे नफिसाने 29 जुलै 2004 रोजी मुंबईतील
आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लग्न मोडल्यामुळे नफिसाने टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या आईवडिलांनी सांगितले होते. नफिसाचे बिझनेसमन गौतम खंडुजासह लग्न ठरले होते. लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच नफिसाला कळले होते, की गौतम खंडुजा विवाहित असून त्याचा आपल्या पत्नीसोबत घटस्फोटसुद्धा झालेला नाही. प्रेमात दगा मिळाल्यामुळे नफिसाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
शर्मिला टागोर यांच्यासोबत होते नाते...
28 मार्च 1978 रोजी बंगळूरुमध्ये नफिसाचा जन्म झाला होता. तिचे वडील कॅथलिक तर आई बंगाली आहे. नफिसाच्या आईचे नाव उषा जोसेफ असून त्या रविंद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबातील आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर या त्यांच्या चुलत बहीण आहेत. नफिसाचे बालपण बंगळूरुमध्ये गेले होते. येथूनच तिने शिक्षण पूर्ण केले होते.
वयाच्या 12 वर्षी सुरु केले होते मॉडेलिंग करिअर..
नफिसाने आपल्या एका नातेवाईकाच्या सांगण्यावरुन वयाच्या बाराव्या वर्षी पहिले मॉडेलिंग असाइनमेंट केले होते. त्यानंतर तिने याच फिल्डसाठी स्वतःला तयार केले आणि 1997मध्ये फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. हा खिताब जिंकणारी ती सर्वाधिक कमी वयाची तरुणी होती. त्यानंतर तिने मिस युनिव्हर्स या स्पर्धेतही आपला सहभाग नोंदवून टॉप 10 स्पर्धकांमध्ये स्थान पटकावले होते.
अनेक टीव्ही शोजमध्ये केले काम...
नफिसा 1999 मध्ये एमटीव्हीच्या व्हिजे इंडिया हंटची जज होती. जवळपास पाच वर्षे एमटीव्हीवरील हाऊसफूल या शोचे सूत्रसंचालन तिने केले होते. सोनी वाहिनीवरील काही शोज आणि मालिकांमध्ये तिने अँकरिंग आणि अभिनय केला होता.
वादग्रस्त ठरला मृत्यू..
नफिसाच्या आईवडिलांनी बिझनेसमन गौतम खंडुजावर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप लावला होता. तर साखरपुडा खूप आधीच मोडला असल्याचे गौतमचे म्हणणे होते. यापूर्वीसुद्धा नफिसाचे दोन ब्रेकअप्स झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मॉडेल-अभिनेत्री नफिसा जोसेफची निवडक छायाचित्रे...