आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Remembering Silk Smitha On Her Birth Anniversary: Strange But Amazing Life Facts About Her

Remembrance: गळफास घेऊन या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली होती आत्महत्या, हे होते यामागचे कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: 2011मध्ये रिलीज झालेला विद्या बालनचा 'द डर्टी पिक्चर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या सिनेमामुळे विद्या बालनचे करिअर यशोशिखरावर पोहोचले. या सिनेमाच्या यशामागे एक नाव दडलेले आहे, ते म्हणजे अभिनेत्री सिल्क स्मिता. दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या खासगी आयुष्यावर हा सिनेमा आधारित होता. आज सिल्क आपल्यात असती तर तिने वयाची 57 वर्षे पूर्ण केली असती. 


ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिताची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत. सिल्कचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला होता. तिचे बालपणीचे नाव विजयलक्ष्मी होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत तिचे शिक्षण झाले.

 

बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्कने सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली.  शूटिंगदरम्यान सिल्क अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून स्मिताही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होती.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, सिल्कच्या खासगी आयुष्याविषयी... 

बातम्या आणखी आहेत...