आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death Aniv: अनेक दिग्गजांनी दिला होता रितेश देशमुखांच्या वडिलांना अखेरचा निरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूरमधल्या बाभळगावचे ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे मुख्यमंत्री असा झंझावाती प्रवास करणारे आणि नंतर केंद्रातही मंत्रीपद भूषवणारे मुरब्बी नेते आणि राजकारणातील एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व विलासराव देशमुख यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने 14 ऑगस्ट 2012 रोजी चेन्नईच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
विलासराव देशमुख यांना तीन मुले आहेत. अमित, रितेश आणि धीरज देशमुख. अमित देशमुख लातूरमधील आमदार आहेत, तर रितेश प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. राजकारणासह बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी विलासराव देशमुख यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते.
जन्म आणि राजकारणातील प्रवास...
26 मे 1945 रोजी लातूमध्ये जन्मलेल्या विलासराव देशमुख यांनी कमी वयातच समाजसेवेचे काम सुरु केले होते. बाभळगावचे ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे मुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास कोणालाही थक्क करणारा आहे. मुख्यमंत्री पदाच्या दुस-या कार्यकाळात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
बॉलिवूडसोबतच्या नात्यामुळे निर्माण झाले होते अनेकदा वाद...
विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्रातील बिझनेस आणि सिनेसृष्टीतील अनेक कुटुंबासोबत जिव्हाळ्याचे नाते होते. बॉलिवूडसोबतच्या नात्यामुळे त्यांना अनेकदा वादाला तोंड द्यावे लागले होते.
- मुख्यमंत्री असताना त्यांनी दिग्दर्शक सुभाष घई यांना चित्रपट संस्था स्थापन करण्यासाठी सरकारच्या वतीने 20 एकर जमीन त्यांच्या अधिकारक्षेत्रात मिळवून दिली होती. 2012 मध्ये मुंबई हायकोर्टाने ही जमीन परत करण्याचे आदेश सुभाष घई यांना दिले होते.
- मुंबई बॉम्बस्फोटानंतर विलासराव मुलगा रितेश आणि निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्यासह हॉटेल ताजची पाहणी करण्यासाठी गेले होते. रामगोपाल वर्मा यांना या विषयावर सिनेमा बनवायचा होता. त्यामुळे विरोधी पक्षाने त्यांच्यावर कडाडून टिका केली होती. हे प्रकरण एवढे चिघळले की विलासरावांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
14 ऑगस्ट रोजी चेन्नई निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबई आणण्यात आले होते. त्यानंतर लातूर जिल्ह्यातील बाभळगावचे या त्यांच्या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विलासराव देशमुख यांच्या अंत्यदर्शनाची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...