आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sanjeev Kumar And Other 7 Stars Of Sholay, Who Are No More

30 वर्षांपूर्वी झाले 'शोले'च्या 'ठाकुर'चे निधन, हे 8 कलाकारसुद्धा आता या जगात नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः हिंदी सिनेसृष्टीचे अष्टपैलू कलाकार संजीव कुमार यांना या जगाचा निरोप घेऊन 30 वर्षांचा काळ लोटला आहे. 6 नोव्हेंबर 1985 रोजी हार्ट अटॅकमुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती. संजीव कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये 'आंधी', 'खिलौना', 'पति, पत्नी और वो' आणि 'अंगूर' या सिनेमांसह अनेक हिट कलाकृती दिल्या आहेत. मात्र शोलेमध्ये त्यांनी वठवलेली ठाकुर बलदेव सिंहची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. 15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झालेला हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दगड आहे. सिनेमा आजही प्रेक्षकांच्या फेवरेट लिस्टमध्ये सामील आहे. 'ठाकुर'सह अशा आणखी काही व्यक्तिरेखा आहेत, ज्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले, मात्र या भूमिका साकारणारे कलाकार आज आपल्यात नाहीत. एक नजर टाकुया या स्टार्सवर...
अमजद खान -
'शोले' सिनेमातील गब्बर सिंहचे पात्र साकारून इतिहास रचणारे अमजद खान आज आपल्यात नाहीये. त्यांनी 27 जुलै 1992 रोजी या जगाला निरोप घेतला. गब्बर सिंहची भूमिका साकारल्यानंतर अमजद खान या सिनेमानंतर खूप चर्चेत आले. त्यांनी म्हटलेले संवाद आजही लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. त्याकाळी गावा-गावात आणि शहरा-शहरात गब्बरच्याच नावाच्या चर्चा होत्या. खांद्यावर काडतूसाची पेटी अडकवून तंबाखू खाण्याचा अनोखा अंदाज, भयावह रुपात हसणे, आपल्या गँगमधील लोकांना प्रश्न-उत्तर आणि नंतर शिवीगाळ, या अदांनी गब्बर चांगलाच लोकांच्या लक्षात राहिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 'शोले'च्या आणखी काही स्टार्सविषयी...