आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजीव कुमारांनी प्रेम नाकारल्याने ही सुंदर अभिनेत्री झाली मनोरुग्ण, आता ओळखणेही कठीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या अभिनय आणि गायनाने बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सुलक्षणा पंडीत. प्रसिद्ध संगीतकार जोडी जतिन-ललित यांची ही बहीण. संगीताचा वारसा लाभलेल्या हरियाणातील एका मोठ्या घराण्यात 12 जुलै 1948 रोजी सुलक्षणाचा जन्म झाला. सुंदर आवाजाची देणगी लाभलेल्या सुलक्षणा पंडीत यांनी एकेकाळी बॉलिवूडच्या सर्व आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले होते. अतिशय संवेदनशील अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. सुलक्षणा यांची धाकटी बहीण विजेयता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलक्षणा पंडीत यांनी संजीव कुमार यांच्यावर जीवापाड प्रेम केले होते. मात्र त्याकाळात संजीव कुमार हेमामालिनीच्या प्रेमात पडले होते. त्यामुळे त्यांनी सुलक्षणा यांचे प्रेम नाकारले. संजीव कुमार यांनी प्रेम नाकारल्याने ही सुंदर अभिनेत्री मनोरुग्ण झाली. 

मुंबईतील मोठ्या फ्लॅटमध्ये एकट्या वास्तव्याला आहेत सुलक्षणा...  
एकेकाळी प्रसिद्धीझोतात राहणारी ही अभिनेत्री आज मुंबईतील आपल्या फ्लॅटमध्ये एकांतवासात जीवन व्यतित करत आहे. घरात फक्त नैराश्य आहे.  

घरातील किराणा आणि वीजेचे बील भरतात बहिणी...
बोलके डोळे, गोरा वर्ण आणि डिझायनर कपड्यांसाठी सुलक्षणा ओळखल्या जायच्या. पण आज परिस्थिती अशी आहे, की त्यांच्या घरात किराणा त्यांची बहीण विजेयता पंडीत भरतात. तर भाऊ जतिन-ललित खर्चासाठी दर महिन्याला काही पैसे देतात. 70 आणि 80 चा काळ गाजवणारी आणि अतिशय देखण्या या अभिनेत्रीला यावेळी चक्क ओळखणे कठीण गेले होते. आदेश श्रीवास्तव हे सुलक्षणा यांची धाकटी बहीण विजेता पंडीत हिचे पती होते.

सुलक्षणा पंडीत यांच्याविषयी..  
सुलक्षणा पंडीत संगीताचा वारसा लाभलेल्या एका मोठ्या घराण्यातील आहे. नारायण प्रताप पंडीत हे त्यांच्या वडिलांचे नाव. प्रसिद्ध संगीतकार जतिन-ललित यांची ही बहीण आहे. तर अभिनेत्री विजेयता पंडीत हे तिच्या बहिणीचे नाव आहे. आदेश श्रीवास्तव विजेता पंडीत यांचे पती होते. पंडीत जसराज हे सुलक्षणा यांचे सख्खे काका आहेत. तीन बहिणी आणि तीन भावंड असा त्यांचा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच संध्या सिंह नावाच्या त्यांच्या बहिणीचे निधन झाले होते.
 
पुढील स्लाईडमध्ये वाचा, सुलक्षणा पंडीत यांचे मनोरुग्ण होण्यामागचे कारण...
बातम्या आणखी आहेत...