आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका व्यक्तीच्या भितीमुळे शर्मिला टागोरांनी काढले होते मुंबईत लागलेले बिकिनीतील पोस्टर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


8 डिसेंबर म्हणजे अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा वाढदिवस. 8 डिसेंबर 1944 रोजी हैदराबाद येथे जन्मलेल्या शर्मिला यांनी वयाची 73 वर्षे पूर्ण केली आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणूनसुध्दा त्यांना ओळखले जाते. शर्मिला टागोर खुल्या विचारांच्या आहेत. परंतु त्यांच्या सासूबाई नवाबी घराण्यातून असल्याने पारंपारिक विचाराच्या होत्या. त्यांच्या हट्टापायी शर्मिला यांना नवाब पटौदीसोबत लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारावा लागला. भोपाळमध्ये नवाब कुटुंबांच्या जवळच्या एका व्यक्तीने सांगितल्यानुसार, कोणत्याही परिस्थितीत सासू साजिदा सुल्तान नाराज होणार नाहीत, यासाठी शर्मिला नेहमी प्रयत्नशील राहात असतं. 


सासूबाईंच्या भितीने काढले होते बिकिनी पोस्टर
भोपाळचे नवाब कुटुंबाच्या जवळील एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर divyamarathi.comला सांगितले, की 1967मध्ये नवाब पटौदीची आई साजिदा सुल्तान शर्मिलाला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला यांचा बहुचर्चित 'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमा प्रदर्शित होणार होता. या चित्रपटात शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती. शर्मिला यांचे बिकिनीतील पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते. शर्मिला यांना नवाब पटौदी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स निर्मात्यांना काढून टाकण्यास सांगितले होते. शर्मिला यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पटौदी यांच्या आई नाराज होतील. 

सेन्सॉर बोर्डच्या चेअरपर्सन होत्या, तेव्हा व्यक्त केली होती अंगप्रदर्शनावर चिंता
शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्षा होत्या. या पदावर कार्यरत असताना आजच्या काळात होणा-या अंगप्रदर्शनावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती.


पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, शर्मिला यांची जूनी छायाचित्रे..

बातम्या आणखी आहेत...