आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गब्बर, ठाकुरसह \'शोले\'च्या या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप, जाणून घ्या त्यांच्याविषयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये गब्बर सिंह अर्थातच अमजद खान आणि ठाकुर अर्थातच संजीव कुमार)
मुंबई- भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला 'शोले' सिनेमा 15 ऑगस्ट 1975 रोजी रिलीज झाला होता. आता 40 वर्षांनंतर हा सिनेमा पाकिस्तानमध्ये रिलीज झाला. शुक्रवारी (21 एप्रिल) या सिनेमाचा प्रीमिअर कराचीमध्ये ठेवण्याता आला होता. आज 40 वर्षांनंतर केवळ शोलचे स्टारकास्ट बदललेच नव्हे तर यामध्ये काम करणा-या काही कलाकारांनी जगाचा निरोप घेतला. divyamarathi.com तुम्हाला सिनेमातील अशा काही कलाकारांविषयी सांगत आहे, ज्यांनी या जगाला अलविदा म्हटले आहे.
अमजद खान -
'शोले' सिनेमातील गब्बर सिंहचे पात्र साकारून इतिहास रचणारे अमजद खान आज आपल्यात नाहीये. त्यांनी 27 जुलै 1992 रोजी या जगाला निरोप घेतला. गब्बर सिंहची भूमिका साकारल्यानंतर अमजद खान या सिनेमानंतर खूप चर्चेत आले. त्यांनी म्हटलेले संवाद आजही लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. त्याकाळी गावा-गावात आणि शहरा-शहरात गब्बरच्याच नावाच्या चर्चा होत्या. खांद्यावर काडतूसाची पेटी अडकवून तंबाखू खाण्याचा अनोखा अंदाज, भयावह रुपात हसणे, आपल्या गँगमधील लोकांना प्रश्न-उत्तर आणि नंतर शिवीगाळ, या अदांनी गब्बर चांगलाच लोकांच्या लक्षात राहिला.
संजीव कुमार-
हिंदी सिनेसृष्टीचे अष्टपैलू कलाकार संजीव कुमार यांनी शोलमध्ये ठाकुर बलदेव सिंहची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली भूमिका आजही लोकांना सिनेमा पुन्हा-पुन्हा पाहण्यास भाग पाडते. 6 नोव्हेंबर 1985 रोजी वयाच्या 47व्या संजीव कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या शोलेच्या अशाच काही स्टार्सविषयी...