आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'शोले'ची 41 वर्षे : ठाकुर, गब्बरसह हे 9 सेलेब्स आता या जगात नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये गब्बर सिंह अर्थातच अमजद खान आणि ठाकुर अर्थातच संजीव कुमार) - Divya Marathi
(फोटोमध्ये गब्बर सिंह अर्थातच अमजद खान आणि ठाकुर अर्थातच संजीव कुमार)
मुंबई- भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला 'शोले' सिनेमाच्या रिलीजला 15 ऑगस्ट रोजी 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 ऑगस्ट 1975 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात गब्बर, ठाकूर या अविस्मरणीय भूमिका वठवणारे कलाकार आता या जगात नाही. यांच्यासोबतच रहिम चाचा, सांभा या भूमिका वठवणा-या कलाकारांनी काही वर्षांपूर्वी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

'शोले'ला 41 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला सिनेमातील अशा काही कलाकारांविषयी सांगत आहे, ज्यांनी या जगाला अलविदा म्हटले आहे.
अमजद खान (गब्बर सिंह) -
'शोले' सिनेमातील गब्बर सिंहचे पात्र साकारून इतिहास रचणारे अमजद खान आज आपल्यात नाहीये. त्यांनी 27 जुलै 1992 रोजी या जगाला निरोप घेतला. गब्बर सिंहची भूमिका साकारल्यानंतर अमजद खान या सिनेमानंतर खूप चर्चेत आले. त्यांनी म्हटलेले संवाद आजही लोकांच्या तोंडून ऐकायला मिळतात. त्याकाळी गावा-गावात आणि शहरा-शहरात गब्बरच्याच नावाच्या चर्चा होत्या. खांद्यावर काडतूसाची पेटी अडकवून तंबाखू खाण्याचा अनोखा अंदाज, भयावह रुपात हसणे, आपल्या गँगमधील लोकांना प्रश्न-उत्तर आणि नंतर शिवीगाळ, या अदांनी गब्बर चांगलाच लोकांच्या लक्षात राहिला.
संजीव कुमार (ठाकुर) -
हिंदी सिनेसृष्टीचे अष्टपैलू कलाकार संजीव कुमार यांनी शोलमध्ये ठाकुर बलदेव सिंहची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेली भूमिका आजही लोकांना सिनेमा पुन्हा-पुन्हा पाहण्यास भाग पाडते. 6 नोव्हेंबर 1985 रोजी वयाच्या 47व्या संजीव कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या शोलेच्या अशाच काही स्टार्सविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...