आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोर कुमार यांना घाबरायचे महमूद, जाणून घ्या आयुष्यातील रंजक FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, हुसैनी, महमूद खैरुन्निसा (वरती), जुबैदा, मलिकुंनिसा (मीनू मुमताज), उस्मान अली (मध्ये), शौकत अली आणि अनवर अली (खाली)
मुंबई- बॉलिवूडचे प्रसिध्द विनोदवीर आणि अभिनेते महमूद आज आपल्यात असते तर 83 वर्षांचे झाले असते. 29 सप्टेंबर 1932ला मुंबईमध्ये जन्मलेले महमूद यांचे 23 जुलै 2004ला डनमोर, पेन्सिलव्हेनियामध्ये निधन झाले. सात बहीण-भावंडांमध्ये ते दुस-या नंबरवर होते. त्यांच्या थोरल्या बहिणीचे नाव हुसैनी होते आणि इतरह बहीण-भावंडांचे नाव खैरुन्निसा, जुबैदा, मलिकुंनिसा (मीनू मुमताज), उस्मान अली, शौकत अली आणि अनवर अली असे आहेत. महमूद यांनी आपल्या आपल्या काळातील प्रत्येक अभिनेता-अभिनेत्री यांच्यासोबत काम केले. महमूद यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात 'सीआयडी' (1956)पासून केली होती.
तसे पाहता, महमूद यांनी सिनेमांत विनोदवीर म्हणून काम केले, परंतु प्रेक्षकांना सिनेमांमध्ये त्यांच्या उपस्थितीचा प्रतिक्षा असायची. ते सिनेमांत प्रेक्षकांना जितके हसवायचे, तितकेच ते मदतसुध्दा करत होते. महमूद यांनी अनेक विनोदवीरांना सिनेमांत काम करण्याची संधी दिली. त्यामध्ये एक ज्यूनिअर महमूदसुध्दा आहे. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी...
महमूद यांच्या गर्लफ्रेंडचा हात पकडताना लाजत होते अमिताभ-
महमूद यांनी 'बॉम्बे टू गोवा'मध्ये अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिकेसाठी काम दिले होते. त्याकाळी महमूद यांचे अरूणा ईराणी यांच्यासह अफेअर चालू होते. त्यामुळे अमिताभ यांनी अरुणा ईराणी यांचा सिनेमात हात पकडण्यास लाज वाटायची. 'बॉम्बे टू गोवा' हिट झाला आणि अमिताभ यांना 'जंजीर' सिनेमा करण्याची संधी मिळाली. सांगितले जाते, की अमिताभ महमूद यांचा भाऊ अनवर यांच्या फ्लॅटमध्ये महिना-महिना राहत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या महमूद यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी...