आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी कुटुंबासोबत होते Big Bच्या वडिलांचे नाते, 'मधुशाला'ने एकवटली चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे मुलगा अमिताभसोबत हरिवंश राय, उजवीकडे राजीव-सोनिया गांधी आणि पत्नी तेजीसोबत, खाली इंदिरा गांधीसोबत हरिवंश राय बच्चन
27 नोव्हेंबरला हिंदी भाषेचे प्रसिध्द कवी आणि लेखक हरिवंश राय बच्चय यांची जयंती आहे. त्यांचा जन्म 1907ला इलाहाबादच्या जवळ असलेल्या प्रतापगड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात झाला. घरात प्रेमाने त्यांना 'बच्चन' म्हणून बोलावत होते. बच्चन यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी ते इलाहाबाद आणि नंतर कॅम्ब्रिजला गेले. येथून त्यांनी इंग्लिश लिट्रेचरचे प्रसिध्द कवी डब्ल्यू बी यीट्सच्या कवितांचे रिसर्च केले.
1926मध्ये हरिवंश राय यांचे लग्न श्यामासोबत झाले. टीबीच्या दिर्घ आजाराने 1936मध्ये श्यामाचे निधन झाले. 1941मध्ये बच्चन यांनी तेजा सूरी यांच्यासोबत केले. या दोन घटना बच्चन यांच्या आयुष्यात खूप खास होत्या. याचा उल्लेख त्यांनी आपल्या कवितांमध्येसुध्दा केला आहे. प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन आणि बिझनेसमन अजिताभ बच्चन ही त्यांची मुले आहेत.
गांधी कुटुंबासोबत राहिले खास संबंध-
बच्चन कुटुंबाचे गांधी घराण्याशी खास नाते होते. हरिवंश यांची पत्नी तेजा आणि इंदिरा गांधी यांची मैत्री तेव्हापासून होती, जेव्हा इंदिरा गांधी यांचे लग्नसुध्दा झालेले नव्हते. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील मुलांची आपसात मैत्री झाली. जेव्हा राजीव गांधी यांनी लग्न केले नव्हते, तेव्हा इटलीहून येऊन सोनिया यांनी काही दिवस बच्चन कुटुंबासोबत घालवले होते. लग्नाच्या काही विधी बच्चन कुटुंबातच पूर्ण झाल्या होत्या. दोन्ही कुटुंबाच्या मैत्रीमुळे अमिताभ 'कुली' सिनेमाच्या शूटिंगवेळी जखमी झाले होते, तेव्हा राजीव गांधी अमेरिकेहून आणि इंदिरा गांधी दिल्लीहून त्यांना पाहण्यासाठी आलेल्या होत्या.
महत्वपूर्ण हरिवंश रायने 1941पासून 1952पर्यंत इलाहाबाद यूनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिश लिट्रेचर शिकवले. 1955मध्ये कॅम्ब्रिजमधून परत आल्यानंतर त्यांनी भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात हिंदी विशेषज्ञ म्हणून त्यांची निवड झाली. 1966मध्ये ते राज्यसभाचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली.
'दो चट्टाने'साठी 1968मध्ये बच्चन यांना साहित्य अॅकॅडमी पुरस्कार मिळाला. साहित्य योगदानासाठी त्यांना प्रसिध्द सरस्वती सन्मान, उत्तर प्रदेश सरकार यांचे यश भारती सन्मान, सोविएत लँड नेहरू पुरस्कारनेसुध्दा गौरवण्यात आले. बच्चन यांना 1976मध्ये पद्मभूषणसाठी सन्मानित करण्यात आले.
'मधुशाला'मधून एकवटली चर्चा-
1935मध्ये छापलेल्या त्यांच्या मधुशालाने बच्चन यांना खूप प्रसिध्दी दिली. आजसुध्दा मधुशाला वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. चार खंडात प्रकाशित बच्चन यांची आत्मकथा- 'क्या भूलू क्या याद करू', 'नीड का निर्माण फिर', 'बसेरे से दूर' आणि 'दशव्दार से सोपान तक' हिंदी साहित्य जगात अमूल्य मानले जातात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हरिवंश राय बच्चन यांचे न पाहिलेले फोटो...