आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance: \'सूर्यवंशम्\'मध्ये बिग बींसोबत झळकली होती सौंदर्या, प्लेन क्रॅशमध्ये झाले निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिवंगत अभिनेत्री सौंदर्या)
दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्या हिची आज 11 वी पुण्यतिथी आहे. 17 एप्रिल 2004 रोजी बंगळूरुजवळ झालेल्या प्लेन क्रॅशमध्ये तिने निधन झाले होते. सौंदर्याने 1992 मध्ये 'गंधरवा' या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. कन्नड, तेलगू, तामिळ, मल्याळम या भाषांमधील सिनेमांमध्ये सौंदर्याने काम केले होते.
सौंदर्या 90 च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने 100 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला होता. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही तिने आपला हात आजमावला होता. सौंदर्याला 6 साऊथ फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. हिंदीत तिने एकमेव सिनेमात काम केले. या सिनेमाचे नाव होते 'सूर्यवंशम'. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत सौंदर्याने स्क्रिन शेअर केली होती.
पुढील स्लाईड्मसमध्ये पाहा, सौंदर्याची निवडक छायाचित्रे...