शरद ठाकर : दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांच्या पत्नी आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन हयात असत्या तर त्यांनी आज वयाची 101 वर्षे पूर्ण केली असती. त्यांच्या जन्म 12 ऑगस्ट 1914 रोजी तत्कालीन भारतातील पंजाब राज्यातील ल्यालपुर येथे झाला होता. आता हे क्षेत्र पाकिस्तानात आहे.
शिख कुटुंबात तेजी बच्चन यांचा जन्म झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव सरदार खजानसिंग होते. ते पंजाबबमधील बॅरिस्टर होते. बरेली येथे हरिवंशराय बच्चन आणि तेजी यांची पहिली भेट झाली होती. त्याकाळी हरिवंशराय बच्चन इलाहाबाद युनिव्हर्सिटीत इंग्रजीचे शिक्षक होते. तर तेजी या लाहोर येथील फतेहचंद कॉलेजमध्ये सायकोलॉजीच्या प्राध्यापिका होत्या. चार दिवसांच्या भेटीतच तेजी आणि हरिवंशराय बच्चन यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
24 जानेवारी 1942 रोजी कवी बच्चन आणि तेजी लग्नगाठीत अडकले. लग्नाच्यावेळी वर आणि
वधूकडील मंडळींनी लग्नाचा सारखा खर्च उचलला होता. त्यांच्या लग्नात एकुण 800 रुपये खर्च आला होता. यापैकी 400 रुपये तेजी यांच्या कुटुंबीयांनी तर 400 रुपये हरिवंशराय यांच्या कुटुंबीयांनी खर्च केले होते.
पुढे वाचा, कशी झाली होती तेजी आणि बच्चन यांची पहिली भेट आणि कशाप्रकारे इंकलाबहून झाले अमिताभ हे नाव...
(हा लेख गुजरातचे प्रसिद्ध लेखक शरद ठाकर यांनी लिहिला आहे. शरद ठाकर अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहित आहेत. हा लेख त्यातीलच एक भाग आहे. शरद ठाकर गेल्या 20 वर्षांपासून 'डॉक्टर की डायरी' आणि 'रण में खिला गुलाब' नावाने व्यंग लिहित आहेत. आत्तापर्यंत त्यांची 30 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)