आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा 25 वर्षानंतर कसे दिसतात \'महाभारत\'चे हे प्रसिद्ध कलाकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(खरे नावः रुपा गांगुली, भूमिकेचे नावः द्रौपदी)
मुंबईः भारतीय सिनेसृष्टीत बी. आर. चोप्रा यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक आणि कौटुंबिक मुद्यांवर आधारित अगदी स्वच्छ सिनेमे बनवले. 22 एप्रिल 1914 रोजी लुधियानामध्ये जन्मलेले बी. आर. चोप्रा यांनी एक ओर नया दौर, वक्त, हमराज, कानून, गुमराह, इंसाफ का तराजू, निकाह, बाबुल आणि बागवान हे अविस्मरणीय सिनेमे बनवले. तर दुसरीकडे 'महाभारत' या मेगा मालिकेसाठी त्यांना ओळखले जाते. ही मालिका दूरदर्शनच्या इतिहासातील सर्वात यशस्वी मालिका ठरली. बी. आर. चोप्रा यांचे पूत्र रवी चोप्रा यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते.
'महाभारत' बघण्यासाठी नाहीशी व्हायची रस्त्यांवरची गर्दी...
2 ऑक्टोबर 1988 रोजी बी.आर.चोप्रा यांनी टीव्हीवर 'महाभारत' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. ही मालिका बघण्यासाठी प्रेक्षक दर रविवारी सकाळी नऊ वाजता टीव्हीसमोर बसायचे. ज्यांच्या घरी टेलिव्हिजन सेट नव्हता, ते लोक शेजा-यांच्या घरी जाऊन ही मालिका बघायचे. या मालिकेची नोंद गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. 24 जून 1990 या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
आज ही मालिका ऑफ एअर होऊन 25 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र आजही मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या 25 वर्षांत मालिकेतील स्टारकास्टच्या लूकमध्ये बराच बदल झालेला दिसून येतो. Divyamarathi.com तुम्हाला महाभारतातील प्रसिद्ध कलाकारांच्या चेह-यात झालेला बदल छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे.
रुपा गांगुली
25 नोव्हेंबर 1966 मध्ये कोलकाता येथे जन्मलेल्या रुपा गांगुली यांनी महाभारतमध्ये द्रौपदी हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. या मालिकेनंतर त्यांनी काही सिनेमांमध्येही काम केले. मात्र मालिकेमुळे मिळाले यश त्यांना पुन्हा मिळू शकले नाही. 1992 मध्ये रुपा यांन ध्रबू मुखर्जीसोबत लग्न केले. लग्नानंतर त्यांनी मुलगा आकाशला जन्म दिला. लग्नाच्या 14 वर्षांनी म्हणजे 2007 मध्ये त्यांनी आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला. सध्या रुपा राजकारणात सक्रिय आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या महाभारतातील इतर कलाकारांविषयी...