आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • TunTun Aka Uma Devi : First Female Comedian Of Indian Cinema

बॉलिवूडची पहिली फिमेल कॉमेडिअन, शेवटच्या दिवसांत अशी लागली होती दिसायला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टुनटुन अर्थातच उमा देवी
24 नोव्हेंबरला हिंदी सिनेमांची प्रसिध्द कॉमेडिअन टुनटुनची 12वी पुण्यतिथी आहे. 11 जुलै 1923ला उत्तर प्रदेशमध्ये जन्मलेली टुनटुनचे खरे नाव उमा देवी खत्री आहे. ती भारतीय सिनेमाची पहिली विनोदवीर होती.
गायिका म्हणून सुरु केले करिअर-
टुनटुनने करिअरची सुरुवात पार्श्वगायिका म्हणून केली होती, परंतु नंतर जेव्हा या क्षेत्रात मिळाले नाही तेव्हा तिने अभिनय करण्याचा निर्णय घेतला. टुनटुन एक अशी कॉमिक अभिनेत्री बनली, ती ज्या सिनेमात दिसायची तो सिनेमा पाहताना लोक लोटपोट होऊन हसत होते.
जॉनी वॉकरसोबत जमली केमिस्ट्री-
टुनटुन पाच दशके हिंदी सिनेमांत अॅक्टिव्ह होती. 1950मध्ये रिलीज झालेला 'बाबुल' पहिला आणि 1989मध्ये रिलीज झालेला 'शहजादे' टुनटुनचा शेवटचा सिनेमा होता. टुनटुनची कॉमेडी वेगळीच होती. चालण्या-बोलण्याची स्टाइलशिवाय टुनटुन नाराज होण्याच्या स्टाइलनेसुध्दा प्रेक्षकांना लोटपोट हसवत होती. जॉनी वॉकरसोबत टुनटुनची केमिस्ट्री चांगली जुळली होती.
50 आणि 60च्या दशकात तिने आर-पार, Mr. और Mrs. 55, आबरू, एक राज, प्यासा, शराफत, दिल और मोहब्बतसारख्या सिनेमांत काम करून आपल्या कॉमेडीने लोकांची मने जिंकली.
कॉमेडिअनच्या रुपात निर्माण केली ओळख-
गायन क्षेत्रात तिला अपयश आले, परंतु कॉमेडिअन म्हणून तिचे अनेक सिनेमे हिट ठरले आणि भारतीय सिनेसृष्टीतील उत्कृष्ट विनोदवीर म्हणून ती नावारुपास आली. 24 नोव्हेंबर 2003मध्ये तिचे मुंबईमध्ये निधन झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टुनटुनची काही निवडक छायाचित्रे...