आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: बघा बॉलिवूडच्या देखण्या अभिनेत्याचे कुटुंबीय आणि को-स्टारसोबतचे आठवणीतील फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः विनोद खन्ना यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. 1946 साली पेशावर येथे जन्मलेल्या विनोद खन्ना यांचे याचवर्षी एप्रिलमध्ये कॅन्सरमुळे निधन झाले. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुलं असा परिवार आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात दोनदा लग्नं केलं होतं. गीतांजली हे त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव असून अक्षय आणि राहुल खन्ना ही त्यांची मुले आहेत. विनोद यांनी 1990मध्ये कविता यांच्यासोबत दुसरे लग्न केले. दोघांना साक्षी हा मुलगा आणि श्रध्दा ही मुलगी आहे. 

विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर विनोद खन्ना यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले. 1968 मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर अनेक सिनेमात सहाय्यक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारत त्यांनी आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. 1971 मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचा ‘हिरो’ म्हणून प्रवास सुरु झाला. विनोद खन्ना आज आपल्यात नाहीत पण कलाकृतींच्या माध्यमातून ते कायम आपल्यातच असणार आहेत. 

आज विनोद खन्ना यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात, बॉलिवूडच्या या देखण्या अभिनेत्याची आठवणीतील छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...