आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

34 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी झाला होता बिग बींचा पुर्नजन्म, जाणून घ्या काय घडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकने आपल्या फेसबुक अकाउंटवर बिग बींचे हे छायाचित्र शेअर केले आहे. - Divya Marathi
अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकने आपल्या फेसबुक अकाउंटवर बिग बींचे हे छायाचित्र शेअर केले आहे.
बिग बींचा आज (2 ऑगस्ट) वाढदिवस आहे. आश्चर्यचकित झालात ना. अमिताभ बच्चन यांचा खरा वाढदिवस 11 ऑक्टोबरला असला तरीदेखील 2 ऑगस्ट हा दिवस बिग बींच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. कारण याचदिवशी बिग बींना पुनर्जन्म मिळाला होता. स्वतः अमिताभ बच्चन 2 ऑगस्ट 1982 या दिवशी त्यांना नवीन जन्म मिळाला असल्याचे म्हणतात. बिग बींनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन आपल्या चाहत्यांच्या प्रेमाबद्दल धन्यवाद व्यक्त केले आहेत. बिग बींनी लिहिले ''TO ALL THAT HAVE WISHED ME TODAY PRAYED FOR ME AND GIVEN ME LOVE .. I AM INDEBTED FOR LIFE .. I STAND HERE BECAUSE OF YOU .. EVER IN GRATITUDE ..''
कोणती जीवघेणी घटना घडली होती बिग बींसोबत...
6 जुलै 1982 रोजी 'कुली' सिनेमाच्या सेटवर घडलेल्या एका दुर्घटनेमुळे बिग बी मृत्यूच्या दाढेत गेले होते. 'कुली'च्या सेटवर अमिताभला एका प्रसंगात पुनीत इसार या कलाकाराकडून पोटात बसलेल्या ठोश्यामुळे त्यांच्या जिवावर बेतले होते. या अपघातानंतर बिग बी अनेक दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते.

पुनीत इसार या कलाकाराने मारलेल्या ठोश्यामुळे बिग बींच्या पोटातील आतडे फाटले होते. त्यामुळे त्यांना बराच रक्तस्त्रावसुद्धा झाला होता. डॉक्टरांच्या अथक परिश्रमांनंतर आणि बिग बींच्या दृढ आत्मविश्वासामुळे ते यातून तो ठणठणीतपणे बरे होऊन पुन्हा तेवढय़ाच जोशात प्रेक्षकांसमोर आले. 2 ऑगस्ट 1982 रोजी बिग बींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कुली'च्या सेटवर घडलेल्या घटनेची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...