आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबी सिनेमांचे सुपरस्टार होते धर्मेंद्र यांचे \'भाऊ\', शूटिंग सेटवरच झाली होती हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र आणि वीरेंद्र - Divya Marathi
धर्मेंद्र आणि वीरेंद्र
पंजाबी सिनेमांमध्ये अनेक स्टार्स येऊन गेले, पण एका सुपरस्टार होता, ज्याची लोकप्रियता आणि स्टारडम बघून भल्याभल्यांना घाम फुटला होता. हीच लोकप्रियता या सुपरस्टारसाठी जीवघेणी ठरेल, याचा विचारदेखील कुणी केला नसेल. आम्ही बोलतोय ते बॉलिवूडचे हीमॅन धर्मेंद्र यांचे चुलत भाऊ वीरेंद्र सिंह यांच्याविषयी. सिनेमाच्या सेटवरच दहशतवाद्यांनी गोळी मारुन त्यांची हत्या केली होती. 

त्या दिवशी 'जट ते जमीन'चे शूटिंग करत होते वीरेंद्र... 
- ही 6 डिसेंबर 1988 सालीची गोष्ट आहे. त्या दिवशी वीरेंद्र सिंह 'जट ते जमीन' या सिनेमाचे शूटिंग करत होते. 
- याच सिनेमाच्या सेटवर त्यांची काही लोकांनी हत्या केली. त्यांची हत्या का करण्यात आली आणि यामागे कुणाचा हात होता, हे आजही रहस्यच आहे. 
- पण असे म्हटले जाते, की त्यांची लोकप्रियताच त्यांच्यासाठी जीवघेणी ठेरली. अल्पावधीतच वीरेंद्र सिंह पंजाबी सिनेमांचे एवढे मोठे सुपरस्टार बनले, की त्यांचे यश बघून त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले. 
- काही लोकांना त्यांचे हे यश बघवले गेले नाही. असेही म्हटले जाते, की काही दहशतवाद्यांनी  त्यांची हत्या केली होती. 
- त्याकाळात दहशतवादी कारवायांना वेग आला होता. अशा वातावरणात शूटिंग करु नये, असा सल्ला वीरेंद्र सिंह यांना देण्यात आला होता.  पण त्यांनी कुणाचेही म्हणणे ऐकले नाही आणि ते बळी पडले.  
- मृत्यूसमयी वीरेंद्र केवळ 40 वर्षांचे होते. 
 
1975 साली आला होता वीरेंद्र यांचा पहिला सिनेमा... 
- वीरेंद्र सिंह यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात 1975 साली आलेल्या 'तेरी मेरी एक जिंदड़ी' या सिनेमाद्वारे केली होती. या सिनेमात त्यांचे भाऊ धर्मेंद्रसुद्धा झळकले होते. 
- हा सिनेमा हिट ठरला आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांनी 'धरम जीत' (1975), 'कुंवारा मामा' (1979), 'जट शूरमे' (1983), 'रांझा मेरा यार' (1984) आणि 'वॅरी जट' (198) सह 25 हून अधिक सिनेमे केले. 
- 80 च्या दशकात वीरेंद्र सिंह यांनी पंजाबी फिल्म इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवले होते. प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक त्यांना आपल्या सिनेमात साइन करण्यासाठी आतुर असायचा.  
- 12 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये वीरेंद्र यांनी 25 सिनेमे बनवले आणि सर्वचे सर्व सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. केवळ पंजाबीच नव्हे तर त्यांनी दोन हिंदी सिनेमे बनवले. 'खेल मुकद्दर का' आणि 'दो चेहरे' हे सिनेमे सुपरहिट ठरले होते.

पुढील स्लाईड्सवर वाचा, वीरेंद्र यांच्या आयुष्याशी निगडीत खास गोष्टी... 
बातम्या आणखी आहेत...