आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'जंजीर\' ला झाली 44 वर्षे पूर्ण, चित्रपटातील या 9 कलाकारांनी जगाला केले अलविदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट 'जंजीर' आज रिलीज होऊन 44 वर्ष पूर्ण झाले आहेत. 11 मे 1973 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने अमिताभ यांना 'अँग्री यंग मॅन'ची ओळख दिली होती. अमिताभ यांच्या चित्रपट कारकिर्दीत 'जंजीर' मैलाचा दगड ठरला होता. चित्रपटाच्या जबरदस्त यशाने अमिताभ यांना स्टारडम दिले आणि त्यांनी आयुष्यभर मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्यांनी एकाहून एक हिट चित्रपटाची लाईनच लावली. 
या 44 वर्षात या चित्रपटातील अनेक कलाकारांनी जगाला अलविदा केले आहे. यांमध्ये अजीत, प्राण, ओमप्रकाश, सत्येन कपूर, मॅकमोहन आणि इफ्तेखार यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. आज याच स्टार्सविषयी आपण जाणून घेणार आहोत. 
 
अजीत 
अजीतने 'जंजीर' चित्रपटात सेठ धरम द्याल तेजाची भूमिका केली होती. ते चित्रपटातील प्रमुख व्हिलेन होते. 'जंजीर' नंतर अजीत यांना खलनायक म्हणून वेगळीच ओळख मिळाली. चित्रपटांत त्यांनी डेब्यू हिरो म्हणून केला होता. त्यांचे खरे नाव हामिद अली खान होते. अजीत यांनी 22 ऑक्टोबर 1998 साली वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 
 
प्राण 
प्रसिद्ध अभिनेता प्राण आता या जगात नाही. 12 जुलै 2013 रोजी निधन झालेल्या अभिनेता प्राण यांनी चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा मित्र शेर खानची भूमिका केली होती. चित्रपटात त्यांचा लुक आणि बोलण्याची पद्धत पठाणी स्टाईल होती. या चित्रपटात प्राण आणि अमिताभ यांनी प्रथमच चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर या स्टार जोडीने एकुण 14 चित्रपटात सोबत काम केले. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, 'जंजीर' चित्रपटातील काही कलाकार जे आता या जगात नाहीत..
बातम्या आणखी आहेत...