आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाएदपासून सलमानच्या भावापर्यंत, या 10 मुस्लिम स्टार्सने केले दुस-या धर्मात लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाएद खान-मलायका पारेख, सोहेल खान-सीमा सचदेव - Divya Marathi
जाएद खान-मलायका पारेख, सोहेल खान-सीमा सचदेव
मुंबई: 2003मध्ये 'चुरा लिया है तुमने' सिनेमातून डेब्यू करणारा जाएद खान 36 वर्षांचा झाला आहे. गतकाळातील अभिनेते संजय खान यांचा मुलगा जाएदचा जन्म 5 जुलै 1980ला झाला. 'मै हू न', 'लव ब्रेकअप्स जिंदगी'सारख्या सिनेमांत दिसलेल्या जाएदला बी-टाऊनमध्ये प्रसिध्दी मिळाली नाही. परंतु तो स्वत:चा धर्म सोडून दुस-या धर्माच्या तरुणीसोबत लग्न करणा-या सेलेब्समध्ये सामील आहे. मुस्लिम कुटुंबातील जाएदने बालपणीची गुजराती मैत्रीण मलायका
पारेखसोबत 2005मध्ये लग्न केले. दोघांना जिदान आणि आरिज ही दोन मुले आहेत.
सलमान खानच्या भावानेसुध्दा केलेय दुस-या धर्मात लग्न...
सोहेल खानचे लग्न सीमा सचदेवसोबत झाले आहे. या दाम्पत्याला दोन मुले असून निर्वाण आणि योहान ही त्यांची नावे आहेत. रंजक गोष्ट म्हणजे, सोहेलने सीमासोबत 'प्यार किया तो डरना क्या' या सिनेमाच्या रिलीजच्या दिवशीच पळून जाऊन लग्न थाटले होते. या दोघांच्या लग्नाला सीमाच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे सोहेलने सीमासोबत पळून जाऊन आर्य समाज मंदिरात फिल्मी स्टाइलने लग्न केले होते. नंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला समंती दिली. सोहेलची पत्नी प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.
जायेद-सोहेलशिवाय अनेक सेलेब्स आहेत, जे मुस्लिम स्टार आहेत पण त्यांनी वेगळ्या धर्मातील तरुणींसोबत लग्न केले...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या त्यांच्याविषयी...
बातम्या आणखी आहेत...