आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Star Daughters : कुणी यावर्षी केले सिनेसृष्टीत पदार्पण तर कुणाचे सुरु आहे शिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे- मुलगी टीनासोबत गोविंदा, उजवीकडे - मुलगी कृष्णासोबत जॅकी श्रॉफ) - Divya Marathi
(डावीकडे- मुलगी टीनासोबत गोविंदा, उजवीकडे - मुलगी कृष्णासोबत जॅकी श्रॉफ)
मुंबईः बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांच्या मुलींनी आता तारुण्यात पदार्पण केले आहे. यापैकी काही जणांच्या मुलींचे शिक्षण सुरु आहेत, तर काही स्टार मुलींनी याचवर्षी सिनेसृष्टीत आपल्या करिअरला सुरुवात केली. divyamarathi.com या पॅकेजमधून अशाच 10 स्टार मुलींविषयी सांगत आहे...

1. गोविंदाची मुलगी टीनाने याचवर्षी केले डेब्यू
बॉलिवूडमध्ये 'हीरो नंबर 1' नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेता गोविंदा यांची लाडकी लेक नर्मदा उर्फ टीना हिने यावर्षी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. बॉलिवूड पदार्पणासाठी तिने स्वतःचे नाव बदलेले आहे. इंडस्ट्रीत आता ती टीना नावाने ओळखली जाते. याच नावासोबत तिने डेब्यू केले. तिची प्रमुख भूमिका असलेला 'सेकंड हँड हसबंड' हा सिनेमा यावर्षी जुलै महिन्यात रिलीज झाला. 'सेकंड हँड हसबंड'मध्ये टीनासह धर्मेंद्र, गिप्पी ग्रेवाल आणि गीता बसरा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले.
2. करण जोहरची असिस्टंट डायरेक्टर आहे जॅकी श्रॉफची मुलगी
जग्गू दादा उर्फ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरने 2014मध्ये 'हीरोपंती' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. तर त्यांची मुलगी कृष्णानेसुद्धा बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. मात्र कृष्णा अभिनयाकडे वळली नाहीये. पडद्यामागे काम करण्यास ती इच्छूक आहे. दिग्दर्शक करण जोहरकडे ती असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करते. दिग्दर्शनाचे बारकावे शिकण्यासाठी तिने करण जोहरला जॉईन केले असून भविष्यात सिनेमे दिग्दर्शित करण्याची तिची इच्छा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आणखी 8 स्टार मुलींविषयी...