आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Can You Guess The Child Leaning On Atul Agnihotri’s Shoulder In This Pic? Hint: She Is A Star Sister

अतुल अग्निहोत्रीसोबतच्या या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का? ही आहे सुपरस्टारची लाडकी बहीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड स्टार्सची अतिशय जुनी छायाचित्रे म्हणजे जणू आठवणींचा खजिनाच असतो. कधी कधी तर अतिशय दुर्मिळ छायाचित्रे बघून बघणारे अवाक् देखील होतात. जुनी आणि लेटेस्ट छायाचित्रे बघताना स्टार्सच्या चेह-यात किती कमालीचा बदल झाला, तेसुद्धा आपण बघू शकतो. अशाच काही दुर्मिळ छायाचित्रांचे कलेक्शन आम्ही खास divyamarathi.com च्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत.

वरील छायाचित्रात दिसणारे हे तिघे कोण असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. वरील छायाचित्रात दिसणारे हे आहेत बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे भावोजी. सलमानची बहीण अलविरा खान हिचे पती आणि बॉलिवूड अभिनेता अतुल अग्निहोत्री. त्यांच्यासोबत त्यांच्या मांडीवर बसलेली ही चिमुकली दुसरी तिसरी कुणी नसून सलमानची लाडकी बहीण अर्पिता खान आहे. होय. ही चिमुकली हेलन आणि सलीम खान यांची दत्तक मुलगी अर्पिता आहे. अर्पिता तान्ही असतानाच सलीम खान यांनी तिला दत्तक घेतले होते. अर्पिता सलमान खानच्या अतिशय जवळ असून सलमानचे पनवेल येथील फार्म हाऊसला अर्पिताचे नाव देण्यात आले आहे. दिल्लीचा बिझनेसमन आयुष शर्मासोबत तिचे लग्न झाले असून आता ती एका चिमुकल्याची आई आहे.

अर्पिता आणि अतुल अग्निहोत्री यांच्या या छायाचित्राप्रमाणेच आम्ही तुम्हाला अक्षय कुमारसोबतचा चिमुकला रणवीर सिंह, टक्कल पडलेला सलमान खान, यासंह सेलिब्रिटींची जुनी छायाचित्रे बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...