आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : 'केम छे, पापी छे'... जेव्हा बॉलिवूड गाण्यांना लागला विचित्र लिरिक्सचा तडका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अर्शद वारसी आणि जॅकी भगनानी स्टारर 'वेलकम टू कराची' हा सिनेमा आज बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर आणि विशेषतः त्यातील संवाद सिनेमाला खास बनवतात. मात्र या सिनेमातील विचित्र लिरिक्स असलेली गाणी सिनेमाचे महत्त्व कमी करेल की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सिनेमाचे संगीतकार रोचक कोहली, जीत गांगुली आणि अहमद नदीम आहेत. या सिनेमात एकुण 4 गाणी असून सर्व गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतील अशी नाहीयेत. मात्र विचित्र लिरिक्समुळे ही गाणी प्रेक्षकांना नक्कीच हसवतील.
सिनेमात एक पार्टी नंबर असून 'बोट मां कुकड़ूकू' हे गाण्याचे बोल आहेत. मीका सिंग, शिवी आणि रोचक कोहली यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. रोचक कोहली आणि रवी सिंघल यांच्या लेखणीतून साकारलेले हे गाणे प्रेक्षकांची निराशा करणारे ठरेल, अशी शंका आहे. गाण्याचे बोल काहीसे असे आहेत... ''केम छे, पापी छे दारू फिर भी बाकी छे...कुकड़ूड डूकू...''
खरं तर बॉलिवूडमध्ये दरवर्षी जवळजवळ एक हजार सिनेमे रिलीज होतात. काही सिनेमे त्यातील गाणी आणि संगीताने हिट होतात. तर काही त्यामुळे फ्लॉपसुद्धा ठरतात. Divyamarathi.com आज तुम्हाला 2014-15 मधील Worst Lyrics असलेल्या गाण्यांविषयी सांगत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, 2014-15 मधील Worst Lyrics Songs...