आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्ट्रोव्हर्शिअल विषयांवर बनलेले 11 सिनेमे, ज्यांच्या रिलीजवरुन उठले होते वादंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूडमध्ये वर्षाला एक हजारांहून अधिक सिनेमे रिलीज होतात. यामध्ये काही सिनेमांना विरोधालासुद्धा सामोरे जावे लागते.
25 सप्टेंबर रोजी रिलीज होणारा 'टाइम आउट' हा सिनेमा वादाच्या भोव-यात सापडला आहे. यंगस्टर्स बेस्ड हा सिनेमा होमोसेक्शुअल मुद्द्यावर बनला आहे. या सिनेमाला अनेक स्टुडिओज आणि प्रॉडक्शन हाउसेसने रिजेक्ट केले होते. दीर्घकाळापासून लांबणीवर पडलेला हा सिनेमा अखेर या शुक्रवारी रिलीज होतोय.
तसे पाहता, बॉलिवूडच्या इतिहासात डोकावून बघितले असता, अनेक सिनेमांना त्याच्या बोल्ड कंटेंटमुळे विरोधाचा सामना करावा लागला आहे. काही सिनेमांवर प्रेक्षकांच्या भावना दुखावल्याचा आरोप लागला तर काहींचा शिवीगाळचा भडीमार असल्यामुळे विरोध झाला.
divyamarathi.com या पॅकेजमध्ये तुम्हाला अशाच काही सिनेमांविषयी सांगत आहे...