आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी चोरी तर कुणी भीख मागताना, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आढळले हे 12 बॉलिवूड सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोत डावीकडे - जगदीश माळी, अंतरा माळी आणि गीतांजली नागपाल) - Divya Marathi
(फोटोत डावीकडे - जगदीश माळी, अंतरा माळी आणि गीतांजली नागपाल)

इमरान हाश्मीसोबत काम करणारी अॅक्ट्रेस अलीशा खान काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील ग्रेटर कैलाशच्या रस्त्यांवर हलाखीच्या परिस्थितीत आढळली होती. अलीशाप्रमाणेच बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स आहेत, जे गतकाळात प्रसिध्द होते. त्यांच्याकडे सर्वकाही होते, मात्र अचानक त्यांचे स्टारडम संपले आणि त्यांना रस्त्यावर यावे लागले. काही स्टार्स इतक्या वाईट अवस्थेत दिसले, की लोक त्यांना ओळखूसुध्दा शकले नाहीत.
 
काही एकटेपणाने मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये तर काहींनी दु:खातच प्राण गमावले...
 
जगदीश माळी 
अंतरा माळीचे वडील आणि प्रसिध्द फोटोग्राफर जगदीश माळी यांना मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना पहिल्या गेले होते. त्यानंतर इंडस्ट्रीचा एक आणखी चेहरा समोर आला. जगदीश यांना मिंक बरार नावाच्या मॉडेलने ओळखले आणि त्यांना जेवू घालून सलमान खानच्या कारने घरी पोहोचवले होते. जगदीश मानसिकरित्या स्वास्थ नव्हते. ते फाडलेले कपडे परिधान करत होते. यावरून अंदाजा लावला जाऊ शकतो, की ते किती वाईट परिस्थितीत आयुष्य जगत होते. 13 मे 2013ला त्यांचा मृत्यू झाला.

गीतांजली नागपाल
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध मॉडेल गीतांजली नागपाल हिलाही अशाच प्रकारे रस्त्यावर भीग मागताना पाहण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी ओशिवरा भागात 25 वर्षीय मिताली शर्माला लोखंडवालाच्या रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिले होते. या वेळी तिला ओळखीच्या लोकांनी घरी नेण्याचा प्रयत्न केला होता. यातच कुटुंबीयांनी तिची साथ सोडल्याचे समोर आले आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घेऊया अशाच काही सेलिब्रिटींविषयी, ज्यांचे आयुष्य वाईट परिस्थितीतून गेले... काहींनी जग सोडले तर काही अज्ञातवासात गेले...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...