आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी धर्मेंद्र यांच्याकडे नसायचे जेवणासाठी पैसे, जाणून घ्या स्टार्सच्या संघर्षाविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः 8 डिसेंबर रोजी बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र वयाची 80 वर्षे पूर्ण करत आहेत. 1935 साली पंजाबमध्ये त्यांचा जन्म झाला होता. सिनेमांची आवड असलेल्या धर्मेंद्र यांनी 60 च्या दशकात फिल्मफेअर मॅगझिनच्या वतीने आयोजित टॅलेंट हंट अवॉर्ड आपल्या नावी केला होता. त्यानंतर ते सिनेसृष्टीत करिअर करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. मात्र हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. छोट्या-मोठ्या भूमिका वठवल्यानंतरदेखील त्यांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला होता.
जेवणासाठी नसायचे पैसे
दिल्लीत अलीकडेच धर्मेंद्र यांच्या नावाने एक रेस्तराँ सुरु झाले आहे. येथील संपूर्ण सजावट ही धर्मेंद्र यांच्या सिनेमांपासून प्रेरित आहे. मात्र एक काळ असा होता, जेव्हा धर्मेंद्र पोटभर जेवणदेखील करु शकत नसे. असे म्हटले जाते, की संघर्षाच्या काळात त्यांच्याकडे जेवणासाठी पैसे नसायचे. एकदा तर अभिनेते शशी कपूर यांनी धर्मेंद्र यांना आपल्या घरी जेवू घातले होते. बराच काळ संघर्ष केल्यानंतर धर्मेंद्र बॉलिवूडचे सुपरस्टार बनले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या बॉलिवूडच्या इतर स्टार्सच्या स्ट्रगलविषयी...
बातम्या आणखी आहेत...