आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅटपासून रेखा-अमिताभपर्यंत, या 12 बॉलिवूड स्टार्सनी केलंय B-Grade फिल्म्समध्ये काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः असे म्हटले जाते, की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. कदाचित हाच विचार करुन बॉलिवूडमधील आजच्या अनेक आघाडीच्या कलाकारांनी बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्याचे धाडस केले असावे. काहींनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात असे सिनेमे केले, तर काहींनी ढासळत्या करिअरला तारण्यासाठी बी ग्रेड सिनेमांची वाट चोखाळली. या यादीत रेखा, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांच्यापासून ते कतरिना कैफ, मनिषा कोईरालासह ब-याच कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.

कतरिना कैफने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. लंडनमध्ये एका फॅशन शोमध्ये फिल्ममेकर कैजाद गुस्ताद यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला 'बूम' या सिनेमासाठी साइन केले.
बी ग्रेड सिनेमाद्वारे झाले करिअर सुरु...
अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ आणि गुलशन ग्रोवर स्टारर बूम या बी ग्रेड सिनेमातून 2003 मध्ये कतरिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात मॉडेलची व्यक्तिरेखा साकारणा-या कतरिनाने अनेक बोल्ड आणि बिकिनी सीन्स दिले होते. या सिनेमाला लोकांनी सॉफ्ट पोर्न फिल्म म्हटले होते. एक था टायगर, जिंदगी ना मिलेगी दोबारा, जब तक है जान, धूम 3, बँग बँग या सुपरहिट सिनेमांमध्ये झळकेली कतरिना आज इंडस्ट्रीची यशस्वी अभिनेत्री आहे. मात्र करिअरची सुरुवात तिला बी ग्रेड सिनेमातून करावी लागली होती.
केवळ कतरिनाच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकार बी ग्रेड सिनेमांत झळकले आहेत. कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...