आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 वर्षीय हृषितापासून ते 41 वर्षीय प्रीतीपर्यंत, या 13 सेलिब्रिटींनी थाटले गुपचुप लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हृषिता भट हिने वयाच्या 35 व्या वर्षी गुपचुप लग्न थाटले. 4 मार्च रोजी यूनाइटेड नेशनचे सीनिअर डिप्लोमेट आनंद तिवारीसोबत हृषिताने सप्तपदी घेतल्या. सहा महिने डेटिंग केल्यानंतर या जोडीने फॅमिली आणि क्लोज फ्रेंड्सच्या उपस्थितीत लग्न थाटले. एका एन्टरटेन्मेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत हृषिता म्हणाली, "आमच्या लग्नात केवळ फॅमिली आणि क्लोज फ्रेंड्स सहभागी झाले होते. आम्हाला हा सोहळा अतिशय खासगी ठेवायचा होता. आमच्या आयुष्याच्या नवीन प्रवासासाठी आम्हाला तुमच्या शुभेच्छ आणि आशीर्वाद हवे आहेत." लग्नात हृषिताने रेड कलरचा सुंदर लहेंगा परिधान केला होता. हृषिताशिवाय बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या आहेत, ज्यांनी असेच गुपचुप लग्न थाटले. राणी मुखर्जी, आफताब शिवदासानी, कुणार कपूरसह अनेक सेलेब्सची नावे यात सामील आहेत.

प्रीती झिंटाने थाटले होते गुपचुप लग्न 
बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटाने वयाच्या 41 व्या वर्षी बॉयफ्रेंड जीन गुडइनफसोबत लग्न केले आहे. जीन प्रितीपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. हा लग्नसोहळा अगदी गुपचुप पध्दतीने पार पडला. वेडिंग सेरेमनी लॉस एंजिलिसमध्ये झाली. प्रितीने क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सच्या उपस्थित जीनसोबत सप्तपदी घेतल्या.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या गुपचुप लग्नगाठीत अडकलेल्या सेलेब्सविषयी...
 
बातम्या आणखी आहेत...