एन्टरटेन्मेंट डेस्कः भारतीय अभिनेत्रींच्या सौंदर्याची चर्चा जगभरात होत असते. 19 नोव्हेंबर रोजी अशाच दोन सुंदर अभिनेत्रींचा वाढदिवस आहे. ज्यांनी जगाला
आपल्या सौंदर्याने भूरळ घातली. या अभिनेत्रींची नावे आहेत झीनत अमान आणि सुश्मिता सेन.
भारताला मिळाली पहिली मिस युनिव्हर्स
बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन पहिली भारतीय आहे, जिने मिस युनिव्हर्सचा ताज आपल्या नावी करुन जगभरात भारताचे नाव उंचावले. 1994 मधअये पहिल्यांदा भारतीय तरुणीच्या शिरपेचात मिस युनिव्हर्सचा ताज सजला.
झीनत बनली पहिली मिस एशिया पॅसिफिक
70-80च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान पहिली भारतीय तरुणी आहे, जिने मिस एशिया पॅसिफिकचा किताब आपल्या नावी केला. 1970 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत तिस-या स्थानी राहिल्यानंतर झीनतने याचवर्षी मिस एशिया पॅसिफिकचा किताब जिंकला.
या दोन सुंदर अभिनेत्रींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com वाचकांना अशा भारतीय टॉप ब्युटीजविषयी सांगत आहे, ज्यांनी संपूर्ण जगाला आपल्या सौंदर्याची भूरळ घातली.
कोण आहेत या इंडियन ब्युटीज, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...