आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विंडो सीट'चे नाव झाले 'तमाशा', 'इलास्टिक' झाला 'लव आज कल', अशी बदलली सिनेमांची नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण स्टारर 'तमाशा' या सिनेमाची सध्या बरीच चर्चा रंगत आहे. सहा दिवसांपूर्वी रिलीज झालेला या सिनेमाचा ट्रेलर आत्तापर्यंत 58 लाख लोकांनी पाहिला आहे. इम्तियाज अलीच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाचे नाव सुरुवातील 'विंडो सीट' असे ठेवण्यात आले होते. मात्र नंतर हे शीर्षक बदलून 'तमाशा' असे करण्यात आले.
सिनेमा बनण्याच्या अगदी सुरुवातीला निर्माते-दिग्दर्शक सिनेमाचे प्रायोगिकतत्त्वावर नाव ठेवतात. मात्र नंतर ते बदलून शीर्षक फायनल करण्यात येते. शाहरुख खान, रणबीर कपूर, शाहिद कपूर, दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक स्टार्सच्या सिनेमांची नावे सुरुवातील काही वेगळी होती, मात्र रिलीजपूर्वी ती बदलून दुसरी ठेवण्यात आली. उदाहरणार्थ, शाहरुख खान आणि प्रीती झिंटा स्टारर 'वीर जारा' या सिनेमाचे नाव पूर्वी 'ये कहाँ आ गये हम' असे होते, तर सैफ अली खानच्या 'लव आज कल'चे नाव 'इलास्टिक' असे होते.
या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com तुम्हाला अशाच काही सिनेमांविषयी सांगत आहे, ज्यांचे शीर्षक पूर्वी काही वेगळे आणि नंतर काही वेगळे आहे.
सिनेमांची BEFORE आणि AFTER नावे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...