आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: बॉलिवूडमध्ये झाली 16 वर्षे पूर्ण, अभिषेकचे फॅमिलीसोबत असे गेले बालपण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फॅमिलीसोबत अभिषेक, वरती बालपणी अभिषेक, खाली अभिषेकचे केस कापताना अमिताभ आणि जया बच्चन - Divya Marathi
फॅमिलीसोबत अभिषेक, वरती बालपणी अभिषेक, खाली अभिषेकचे केस कापताना अमिताभ आणि जया बच्चन
मुंबई: अभिषेक बच्चनला बॉलिवूडमध्ये 16 वर्षे पूर्ण झालीत. जे पी दत्ता यांच्या दिग्दर्शनात बनलेला अभिषेकचा 'रिफ्यूजी' हा पहिला सिनेमा 30 जून 2000ला रिलीज झाला होता. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. परंतु हा सिनेमा 2000मध्ये 5वा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला होता. 5 फेब्रुवारी 1976ला मुंबईमध्ये जन्मलेल्या अभिषेकविषयी क्वचितच लोकांना ठाऊक आहे. अभिषेक अभिनेत्यासोबतच निर्माता, प्लेबॅक सिंगर आणि टीव्ही प्रेजेंटरसुध्दा आहे.
बॉलिवूडमध्ये 16 वर्षे पूर्ण झाल्यानंतर काय म्हणाला अभिषेक...
फिल्म इंडस्ट्रीमध्ये 16 वर्षे पूर्ण झाल्याबाबत अभिषेक म्हणतो, 'मला माझे स्वप्न साकार करण्याची संधी मिळाली. मी माझ्या काम आणि फॅमिलीवर खूप प्रेम करतो. हाच माझ्या यशाचा मंत्र आहे.'
अभिषेकच्या डान्सने बिग बींना मिळाली 'खाईके पान बनारसवाला'ची आयडिया...
1978मध्ये आलेल्या 'डॉन' सिनेमात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. या सिनेमातील 'खायके पान बनारसवाला' गाण्यावर बिग बींनी केलेल्या डान्सची खूप प्रशंसा झाली होती. या डान्ससाठी त्यांनी अभिषेककडून प्रेरणा घेतली होती. झाले असे, की अभिषेक केवळ 2 वर्षांचा होता आणि घरी तो फनी डान्स करायचा. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या काही फनी डान्स स्टेप्स आपल्या गाण्यात घेतल्या.
बालपणी 'डिसलेक्सिया' आजाराने त्रस्त होता अभिषेक
अभिषेक बच्चन आज फिट दिसत असला तरी बालपणी त्याला 'डिसलेक्सिया' आजार झाला होता. आमिर खानने या आजारावर 'तारे जमीन पर' सिनेमा तयार केला होता. यामध्ये दर्शिल सफारीने या आजाराने त्रस्त मुलाची भूमिका साकारली होती. या आजारामध्ये शब्द लक्षात ठेवणे, शब्द ओळख नसणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शिवाय, लिहिणे, वाचणे आणि बोलण्यातसुध्दा अडथळा निर्माण होतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अभिषेकचे बालपणीपासून ते आतापर्यंतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...