आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशोशिखरावर असताना काजोलने अजयसोबत लग्नाचा का घेतला निर्णय? 17 वर्षांनी केले उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 90च्या दशकात करिअर यशोशिखरावर असताना बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलने लग्न करुन आपल्या चाहत्यांना धक्का दिला होता. अभिनेता अजय देवगणची काजोलने जोडीदाराच्या रुपात निवड केली. अगदी पारंपरिक पद्धतीने ही जोडी लग्नाच्या गाठीत अडकली. खरं तर करिअर जोमात सुरु असताना सहसा अभिनेत्री लग्न पुढे ढकलत असतात. मात्र काजोलने तसे केले नाही. करिअर पीक पॉईंटवर असताना तिने लग्न करुन सेटल होण्याचा निर्णय घेतला.

पण तिने असे का केले, याचे उत्तर लग्नाच्या तब्बल 17 वर्षांनी काजोलने दिले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, खासगी आयुष्यात स्थिरता आणायची होती. करिअरच्या दगदगीतून शांत व्हायचे होते, म्हणून लग्नाचा निर्णय घेतला.

काजोल म्हणाली, " त्यावेळी मी केलेली ती योग्य गोष्ट होती. त्याअगोदर मी जवळपास आठ ते नऊ वर्षे काम करीत होते. त्यामुळे मला कामाच्या दगदगीतून थोडे शांत व्हायचे होते आणि हे लग्न केल्यामुळे शक्य होणार होते."

ती पुढे म्हणाली, "मी वर्षाला 4 ते 5 सिनेमे करीत होते. मला तसेच करत राहावे असे वाटत नव्हते. माझ्या वागण्यात ते बसणारे नव्हते. त्यामुळे लग्न करावे आणि वर्षातून एकच सिनेमा करावा असे ठरवले होते. आता मी आनंदी आहे आणि सर्व स्थिरसावर झाले आहे."
1999 मध्ये काजोल आणि अजयचे लग्न झाले. हे दोघांना न्यासा ही मुलगी आणि युग हा मुलगा आहे. काजोलने लग्नानंतर 'फना', 'यु मी और हम', 'माय नेम इज खान', 'वुई आर फॅमिली' आणि 'टूनपुर का सुपरहिरो' या सिनेमांत काम केले. अलीकडेच ती 'दिलवाले' या सिनेमात शाहरुखसोबत झळकली होती.

पुढे वाचा, कशी सुरु झाली होती अजय आणि काजोलची लव्ह स्टोरी आणि सोबतच बघा त्यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...