आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अपार्टमेंटमध्ये राहतो हृतिक रोशन, पाहा त्याच्या लॅव्हिश घराचे INSIDE PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हृतिक रोशनचा लिव्हिंग एरिया - Divya Marathi
हृतिक रोशनचा लिव्हिंग एरिया
मुंबई: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा 'मोहनजोदारो' सिनेमा 12 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी हृतिकने कासा व्होग मासिकासाठी फोटोशूट केले आहे. त्याच्या जुहू स्थित सी-फेसिंग अपार्टमेंटची झलक या मासिकाच्या ब्रँड न्यू एडिशनमध्ये दाखवण्यात आली आहे.
कतरिनाचे घर पाहून हृतिकने फायनल केले आर्किटेक्ट...
हृतिकचे लॅव्हिश अपार्टमेंट जुहू स्थित प्राइम बीच बिल्डिंगच्या तिस-या मजल्यावर आहे. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत घराचा आर्किटेक्ट आशिष शाहने सांगितले, की कतरिना कैफच्या घराचे डिझाइन्स आवडल्यानंतर हृतिकने त्याला कॉन्ट्रॅक्ट दिले होते. हृतिकची इच्छा होती, की हे घर त्याची मुले रिहान आणि रिदानच्या इच्छेनुसार तयार केले जावे. घरातील फर्निचरचे शॉपिंग दुबई आणि हृतिकच्या मेव्हणीच्या स्टोरमधून करण्यात आले आहे. याशिवाय वेगवेगळ्या देशांत व्हॅकेशनवर गेलेल्या हृतिकने आपल्या पसंतीने सामान खरेदी केले आहेत. घरातील भिंतींवर कोटेशन्स लावले आहेत, त्यातील काही हृतिकने लिहिले आहेत.
अक्षय कुमारचा शेजारी आहे हृतिक...
अक्षय कुमार आणि हृतिक रोशन शेजारी-शेजारी आहेत. जुहू स्थित सी-फेसिंग प्राइम बीच बिल्डिंगमध्ये दोघांचा आशियाना आहे. अक्षय या इमारतीत मागील अनेक वर्षांपासून राहत आहे. या इमारतीतील चार फ्लॅट अक्षयचे आहेत. तसेच हृतिक मागील वर्षीच तिस-या मजल्यावर शिफ्ट झाला आहे. दोघांनी कधीच कोणता सिनेमात एकत्र काम केले नाही. परंतु दोघांमध्ये खूप चांगले नाते आहे. निर्माता साजिद नाडियाडवालासुद्धा याच इमारतीत राहतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, हृतिक रोशनच्या या लॅव्हिश घराची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...