आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#21YearsOfKaranArjun : एवढ्या वर्षांत आता असे दिसतात स्टार्स, 3 कलाकार नाही या जगात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 13 जानेवारी 1995 रोजी रिलीज झालेल्या 'करन अर्जुन' या सिनेमाला 21 वर्षे झाली आहेत. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. हा सिनेमा दमदार संवादांसाठी आणि भावांमधील दर्शविण्यात आलेल्या प्रेमासाठी ओळखला जातो. रिलीजच्या 21 वर्षांनंतरसुद्धा या सिनेमाची क्रेझ मुळीच कमी झालेली नाही.
पुनर्जन्मावर आधारित या सिनेमात वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पुनर्जन्म घेणाऱ्या दोन भावांची कथा दर्शविण्यात आली आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत शाहरुख खान आणि सलमान खान यांनी काम केले. यांच्या अपोझिट काजोल आणि ममता कुलकर्णी दिसल्या होत्या. राखी, रंजीत, अमरिश पुरी यांच्यादेखील महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात होत्या.
वाढत्या वयाने बदलला स्टारकास्टचा लूक..
21 वर्षे हा खूप मोठा काळ आहे. एवढ्या वर्षांत सर्वसामान्यच नव्हे तर सेलिब्रिटींच्या लूकमध्येही वाढत्या वयाचा परिणाम दिसून येतो. काहीसे असेच, 'करन-अर्जुन' सिनेमातील स्टारकास्टच्या बाबतीही झाले आहे. तर या सिनेमात झळकलेले तीन स्टार्स आता या जगात नाहीये.
या सिनेमाला 21 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला 'करन-अर्जुन'मधील स्टारकास्टच्या तेव्हा आणि आत्ताचा लूक कसा आहे ते दाखवत आहोत. सोबतच सिनेमातील कोणते तीन कलाकार आता या जगात नाहीत, त्यांच्याविषयीसुद्धा या पॅकेजमध्ये तुम्हाला जाणून घेता येईल.
पुढील स्लाईड्मध्ये पाहा, करण अर्जुनची स्टारकास्ट Then and Now...
बातम्या आणखी आहेत...