आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हम आपके हैं कौन’ची 22 वर्षे: आता अशी दिसते \'सलमानची वहिनी\', बघा स्टार्सचा Look

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 ऑगस्ट 1994 रोजी 'हम आपके है कौन' हा ब्लॉकबस्टर सिनेमा रिलीज झाला होता. आज या सिनेमाच्या रिलीजला आज 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. फॅमिली ड्रामा असलेल्या या सिनेमाने त्यावेळी यशाचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते. शंभर कोटींची कमाई करणारा हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ठरला होता.

राजश्री बॅनरच्या या सिनेमामुळे सलमान खान आणि माधुरी दीक्षितचे करिअर यशोशिखरावर पोहोचले होते. आज सलमान आणि माधुरी सुपरस्टार्स असून आपापल्या करिअर आणि आयुष्यात खूप पुढे निघाले आहेत. भारतीय मुल्य, परंपरा, रोमान्स आणि संस्कारांचे मिश्रण असलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तब्बल 21 वर्षांनी सलमान आणि सूरज बडजात्या राजश्री बॅनरच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमातून एकत्र आले होते. चला जाणून घेऊया, सिनेमाची स्टारकास्ट आता म्हणजे 22 वर्षांनंतर काय करत आहेत...
रेणुका शहाणे
या सिनेमानंतर अभिनेत्री रेणुका शहाणे जणू घराघरांतील फेव्हरेट सून बनली होती. तिने या सिनेमात सलमानच्या वहिनीची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या सिनेमानंतर रेणुकाने काही बॉलिवूड सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये अभिनय केला. रेणुका आता दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने दिग्दर्शित केलेल्या 'रिटा' या सिनेमाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते रेणुका आता 49 वर्षांची झाली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सिनेमातील इतर स्टारकास्ट आता कुठे सक्रिय आहे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...