एन्टरटेन्मेंट डेस्कः व्यक्ती मोठा झाल्यानंतर कसाही दिसो परंतु बालपणी सर्वांचेच रुप अगदी मन मोहून टाकणारे असते. मग तो सामान्य व्यक्ती असो अथवा प्रसिध्द व्यक्ती. सर्वांनाच बालपणी खूप प्रेम मिळते. तसेच काही बॉलिवूडच्या स्टार्सच्या बाबतीतही आहे. जे सुप्रसिध्द स्टार्स आज
आपल्यासमोर एका ग्लॅमर जगात वावरत आहेत त्यांचेही बालपण आपल्यासारखेच खूप सुंदर होते. तेही त्यांच्या बालपणी खूप गोंडस आणि सुंदर दिसायचे.
वरील छायाचित्रात दिसणा-या या गोंडस चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का.. ही चिमुकली आज बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून हिने आपल्या करिअरचा श्रीगणेशा केलाय. बरोबर.. ही आहे आलिया भट. आलियाची बालपणीची अनेक छायाचित्रे तुम्ही पाहिली असावीत. मात्र तिची वर दिलेली ही छायाचित्रे क्वचितच तुमच्या बघण्यात आली असावीत.
या पॅकेजमधून आम्ही बी टाऊनच्या अनेक आघाडीच्या स्टार्सच्या अशाच दुर्मिळ छायाचित्रांचा नजराणा खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, विवेक ओबरॉय, सलमान खान, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, रणवीर सिंह, अनुष्का शर्मा यांच्यापासून अनेक सेलिब्रिटींच्या बालपणीची झलक तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे.
चला तर मग पाहा, बालपणी कसे दिसायचे तुमचे आवडते बॉलिवूड स्टार्स...